✕
मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान आणि रेल्वेमंत्री यांचे मानले आभार
By EditorialPublished on
देशातील रेल्वे स्थानकांच्या (Railway Station In Country) आधुनिकीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या 'अमृत भारत स्थानक' (Amrit India Station) योजनेचा शुभारंभ (Plan Launch) आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते झाला

x

देशातील रेल्वे स्थानकांच्या (Railway Station In Country) आधुनिकीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या 'अमृत भारत स्थानक' (Amrit India Station) योजनेचा शुभारंभ (Plan Launch) आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते झाला. या योजनेत महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानकांचा समावेश केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. यापूर्वीच केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या रेल्वे प्रकल्पांसाठी १३ हजार ५३९ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, त्यातून राज्यातील १२३ रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येत असून या स्थानकांमध्ये मूलभूत पायाभूत तसेच अद्ययावत सुविधा आणि रेल्वे मार्गांची कामे सुरू आहेत, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
Next Story
Related News
X

