✕
संवेदनशील प्रतिभावंत आपण गमावला : मुख्यमंत्री
By EditorialPublished on
ख्यातनाम कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Chandrakant Desai) यांचा अकस्मात मृत्यू (Accidental Death) वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने एक व्यापक कलादृष्टी असलेला संवेदनशील प्रतिभावंत आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

x

ख्यातनाम कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Chandrakant Desai) यांचा अकस्मात मृत्यू (Accidental Death) वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने एक व्यापक कलादृष्टी असलेला संवेदनशील प्रतिभावंत आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. 'कला क्षेत्रात नितीन यांनी स्वत:च्या हिंमतीवर ओळख निर्माण केली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी सर्जनशीलतेची छाप उमटवणाऱ्या नितीन यांची अशी एक्झिट अपेक्षित नव्हती. त्यांच्या जाण्याने देसाई कुटुंबीयावर आघात झाला आहे. त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी. नितीन देसाई यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे ही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Editorial
Next Story
Related News
X
