✕
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या
By EditorialPublished on
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी कर्जतमधील एनडी (ND) स्टुडीओमध्ये (Studio) गळफास घेत वयाच्या ५८व्या वर्षी आयुष्य संपवले. देसाईंच्या आत्महत्येने (Suicides) हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे. नितीन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक, निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेते देखील होते.

x

मुंबई : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी कर्जतमधील एनडी (ND) स्टुडीओमध्ये (Studio) गळफास घेत वयाच्या ५८व्या वर्षी आयुष्य संपवले. देसाईंच्या आत्महत्येने (Suicides) हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे. नितीन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक, निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेते देखील होते.
नितीन देसाई यांनी अनेक सुपरहिट हिंदी सिनेमांचे सेट उभारले होते. '१९४२ अ लव्ह स्टोरी', 'हम दिल दे चुके सनम', 'माचिस', 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर' या सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं. नितिन देसाई हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतलं मोठं नाव होतं.
स्टुडीओतील कर्मचाऱ्यांना आत्महत्या केल्याचं कळल्यानंतर त्यांनी लगेचच स्थानिक पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. नितिन देसाई यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
एनडी स्टुडीओ हे नितीन देसाई यांचं दुसरं घरच होतं. आत्महत्येच्या दोन दिवसांपासून ते स्टुडीओमध्येच होते. कालपर्यंत आपल्या टीमला त्यांनी येणाऱ्या प्रोजेक्टबद्दल माहिती दिली होती. पण आज सकाळपासूनच त्यांनी कोणाचाही कॉल उचलला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी एनडी स्टुडीओच्या अधिकाऱ्यांना याबद्दल कळवलं. त्यानंतर त्यांनी दरवाजा तोडला आणि पोलिसांना याबद्दल माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते महाराष्ट्रातील सर्व राजकारण्यांपर्यंत नितीन देसाई यांचे चांगले संबंध होते. ८० च्या दशकात नितीन देसाई यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. '१९४२ अ लव्ह स्टोरी' या सिनेमाने नितीन देसाई यांना खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला होता. पुढे अनेक लोकप्रिय दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं.
नितीन देसाई यांनी शुन्यातून स्वर्ग निर्माण केला आहे. त्यांनी त्यांचं स्वप्न साकार केलं होतं. कला दिग्दर्शन सारख्या वेगळ्या क्षेत्रात नितीन देसाई यांनी मोलाचं काम केलं आहे. गेल्या ३० वर्षांतल्या अनेक सिनेमांच्या कलादिग्दर्शनाची धुरा नितीन देसाई यांनी सांभाळली. वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे त्यांनी केले आहेत.
नितीन देसाई यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यक्तिगत संबंध होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना मुंबईत आले होते तेव्हा कमळातून मोदींना भाजपाच्या कार्यकत्यांसमोर पेश केलं गेलं होतं ती कल्पनाही नितीन देसाई यांची होती. त्यानंतर नरेंद्र मोदी नितीन देसाई यांच्या प्रेमातच पडले.

Editorial
Next Story
Related News
X
