Eknath Shinde Parbhani speech
परभणी, दि. २७ (वार्ताहर) : आज परभणी (Parbhani) शहरात 'शासन आपल्या दारी' (Shasan Aplya Dari) हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) उपस्थित होते. यावेळी परभणीमध्ये करण्यात येणाऱ्या विकासाची त्यांनी माहिती दिली. त्याचबरोबर 'काही लोक पाटण्यात जमले आणि द्वेषाची खिचडी शिजवू लागले', असं म्हणत त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. 'शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आतापर्यंत दीड कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळाला असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हे काम होत असून त्यामध्ये प्रत्येक लाभार्थ्याला लाभ मिळत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आतापर्यंत २२,००० ट्रॅक्टर्सचं वाटप करण्यात आलं आहे. तर २२,५०० रोटर व्हेटर शेतकऱ्यांना वाटले आणि चार लाख लाभार्थ्यांना १३५१ कोटी रुपयांचं वाटप आतापर्यंत करण्यात आलं आहे, अशीही माहिती त्यांनी दिली. महिलांबाबतच्या विशेष योजनांबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, महिलांसाठी केवळ बचतगटच नाही तर शक्तिगटही तयार आहे. महिलांना त्यांचं कुटुंब सांभाळताना स्वतःच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी शासनाने घेतली आहे. महिला बचत गटाची योजना देखील अधिक मजबूत करण्याचं काम शासन आता करणार आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री शिंदेंचा उद्भव ठाकरेंवर निशाणा
मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं. 'काही लोक घरात बसून राज्याचा कारभार ऑनलाईन करत होते. परंतु आम्ही त्यांना एक झटका दिला आणि ऑनलाईनवरुन त्यांना थेट लाईनवर आणलं आहे,' असं मुख्यमंत्री म्हणाले आहे. 'तुमचा भोंगा हा कायम शिव्या शाप देण्यासाठी वाजतो पण आमचा भोंगा हा शासन आपल्या दारीच्या माध्यमातून लोकांसाठी वाजतो,' असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
खोट्या बातम्या पसरवता पसरवता...
'सरकार पडणार, मुख्यमंत्री बदलणार अशा खोट्या बातम्या (Rumors) सतत पसरवल्या जातात. पण या बातम्या पसरवता पसरवता अजित पवारच सरकारमध्ये आले आणि सरकार आणखी मजबूत झालं. सध्या या लोकांकडून राजकारणात गोंधळ निर्माण करण्याचं काम केलं जात आहे. पण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे', असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर घणाघात केला आहे.
विरोधकांनी पाटण्यात द्वेषाची खिचडी शिजवली
लोकसभा निवडणूकीत एनडीएला रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीची बिहारची राजधानी पाटणा येथे बैठक झाली होती. बैठकीवर हल्ला चढवताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आपण पाटणापासून (शासन आपल्या दारी) सुरूवात केली. त्यानंतर काही लोक पाटण्यामध्ये जमा झाले आणि तेथे द्वेषाची, स्वार्थाची खिचडी शिजवू लागले असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
‘परभणीमध्ये विकासाची गंगा आणणार', 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आतापर्यंत दीड कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळाला असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हे काम होत असून त्यामध्ये प्रत्येक लाभार्थ्याला लाभ मिळत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, 'आतापर्यंत २२,००० ट्रॅक्टर्सचं वाटप करण्यात आलं आहे. तर २२,५०० रोटर व्हेटर शेतकऱ्यांना वाटले आणि चार लाख लाभार्थ्यांना १३५१ कोटी रुपयांचं वाटप आतापर्यंत करण्यात आलं आहे.'
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : 'परभणीमध्ये विकासाची गंगा आणणार', असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या माध्यमातून परभणीकरांना आश्वासन दिलं आहे. 'आम्ही हा कार्यक्रम पाटणपासून सुरु केला पण काही लोक पाटण्यात जमले आणि द्वेषाची खिचडी शिजवू लागले', असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. परभणीमध्ये 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे देखील उपस्थित होते. आतापर्यंत दीड कोटी लाभार्थ्यांना लाभ
महिलांसाठी विशेष योजना
'महिलांसाठी केवळ बचतगटच नाही तर शक्तिगट आपल्याला तयार आहे.
महिलांसाठी अनेक विशेष योजनांचं आयोजन करण्यात आलं आहे. महिलांना त्यांचं कुटुंब सांभाळताना स्वतःच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी शासनाने घेतली आहे. महिला बचत गटाची योजना देखील अधिक मजबूत करण्याचं काम शासन आता करणार आहे', असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं. 'काही लोक घरात बसून राज्याचा कारभार ऑनलाईन बसून करत होते. परंतु आम्ही त्यांना एक झटका दिला आणि ऑनलाईनवरुन त्यांना थेट लाईनवर आणलं आहे,' असं मुख्यमंत्री म्हणाले आहे. 'तुमचा भोंगा हा कायम शिव्या शाप देण्यासाठी वाजतो पण आमचा भोंगा हा शासन आपल्या दारीच्या माध्यमातून लोकांसाठी वाजतो,' असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
"काही लोक राजकारणामध्ये गोंधळ निर्माण करत आहेत' '
सरकार पडणार, मुख्यमंत्री बदणार अशा खोट्या बातम्या सतत पसरवल्या जातात. पण या बातम्या पसरवता पसरवता अजित पवारच सरकारमध्ये आले आणि सरकार आणखी मजबूत झालं. सध्या या लोकांकडून राजकारणात गोंधळ निर्माण केल्याचं काम केलं जात आहे. पण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे', असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर घणाघात केला आहे.
सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याची आमची भूमिका आहे, त्याचसाठी आम्ही अनेक योजना आणत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या पाठिशी हे सरकार खंबीरपणे उभं आहे असं आश्वासन दिलं.
Editorial

Editorial

Next Story