India Chandrayaan-4 missionIndia Chandrayaan-4 mission
नवी दिल्ली, दि. २४ (वृत्तसंस्था) : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताच्या चांद्रयानाने बुधवारी यशस्वीपणे लँडिंग केल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. चंद्रावर स्वारी केल्यानंतर आता शास्त्रज्ञ सूर्याच्या दिशेने आपली पावले टाकत आहेत. इस्रोने हे यश साजरे करत असतानाच सूर्यावर आता यान पाठवणार असल्याचे जाहीर केले आहे. सूर्यावर संशोधन करण्यासाठी आपला 'आदित्य एल१' हा लवकरच सूर्याच्या दिशेने रवाना होणार आहे.
इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले, सूर्य मिशनसाठी आदित्य एल १ उपग्रह सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाँच केला जाणार आहे. हे मिशन १२० दिवस म्हणजेच ४ महिन्यांत १५ लाख किमीचे अंतर पार करून सूर्याच्या कक्षेत पोहोचेल. तेथील सौर वातावरणाचा अभ्यास करून आकडे एकत्रित करून पृथ्वीवर पाठवेल.
आदित्य एल १चे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथून केले जाणार आहे. तेथे सूर्याचा अभ्यास करणारी अंतराळावर आधारित भारतीय वेधशाळा तयार केली जात आहे. आदित्य एल१ हे नाव सूर्यदेवाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. हे भारतीय रॉकेट पीएसएलव्ही द्वारे सोडले जाईल. सूर्य मोहिमेनंतर गगनयान मिशन पुढे जाईल. हे मिशन भारताच्या मनुष्य अंतराळ मिशनचा भाग आहे. तसेच इस्रोच्या यादीत शुक्र ग्रहाचाही समावेश आहे. लवकरच इस्त्रो शुक्र ग्रहावरही अभ्यासासाठी यान पाठवणार आहे.
आता चांद्रयान-४ मोहिमेसाठी भारताची जपानशी हातमिळवणी
भारताची चांद्रयान- ३ मोहिम फत्ते झाल्यानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आगामी चंद्रमोहिमेसाठी सज्ज झाली आहे. भारताने चांद्रयान-४ मोहिमेसाठी जपान सोबत हातमिळवणी केली आहे. इस्रोची आगामी चंद्रमोहिम भारत आणि जपान यांची संयुक्त मोहिम असेल. चांद्रयान- ३ च्या यशानंतर आता संपूर्ण जगाच्या नजरा चांद्रयान-४ मोहिमेकडे लागल्या आहेत. चांद्रयान-४ मोहिमेचं नाव लुपेक्स मोहिम असं ठेवण्यात आलं आहे. ही मोहिम चांद्रयान-४ या नावानेही ओळखली जाईल. चांद्रयान- ३ ने पाठवलेल्या माहितीच्या आधारे साठे शोधण्यात येतील. चांद्रयान-४ मोहिमेद्वारे चंद्रावरील पाण्याचे चांद्रयान-४ मोहिमेद्वारे चंद्रावरील पाण्याचे साठे शोधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांतील संशोधनामुळे चंद्रावर पाणी असल्याचं संकेत मिळाले आहेत. चंद्रावरील पाण्याचे साठे, तेथील पाण्याची नेमकी उपलब्धता याचा अभ्यास केला जाईल. मानवाच्या अस्तित्वासाठी पाणी हे अत्यावश्यक आहे. त्यामुळे चंद्रावरील पाण्याचा शोध मानव आणि भविष्यातील अंतराळ संशोधनासाठी फार महत्त्वाचा ठरेल.
Editorial

Editorial

Next Story