✕
दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा आता दोन टप्प्यात!
By EditorialPublished on
नवी दिल्ली, दि. २३ (वृत्तसंस्था) : दहावी (10th) आणि बारावी (12th) बोर्ड परीक्षा (Board Exams) आता दोन टप्प्यात (Phase) होणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने (Union Ministry of Education) आज याबाबतचा निर्णय घेतला आहे. आगामी शैक्षणिक वर्षांपासून बोर

x

नवी दिल्ली, दि. २३ (वृत्तसंस्था) : दहावी (10th) आणि बारावी (12th) बोर्ड परीक्षा (Board Exams) आता दोन टप्प्यात (Phase) होणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने (Union Ministry of Education) आज याबाबतचा निर्णय घेतला आहे. आगामी शैक्षणिक वर्षांपासून बोर्ड परीक्षासंदर्भात मोठा बदल होणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आल्याची माहिती बुधवारी शिक्षण मंत्रालयाने दिली. आता २०२४ (2024) च्या शैक्षणिक सत्रासाठी पाठ्यपुस्तके तयार केली जाणार आहे. त्याशिवाय बोर्ड परीक्षा (Board Exams) दोन टप्प्यात होणार आहेत. ज्या विषयांचा अभ्यास पूर्ण झाला, फक्त तेच पेपर देण्याचं स्वातंत्र्यही देण्यात येणार आहे. त्याशिवाय अकरावी आणि बारावीला दोन भाषा अनिवार्य करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एका भारतीय भाषेचा (Indian language) समावेश असायला हवा, अशी अट घालण्यात आली आहे. बोर्ड परीक्षा (Board Exams) आता वर्षातून दोन टप्प्यात (Phase) होणार आहे. विद्यार्थी दोन्ही वेळा परीक्षा देऊ शकतात, सर्वोत्तम गुण ग्राह्य धरले जातील. अथवा टप्प्या (Phase) टप्प्याने अर्ध्या अर्ध्या विषयांची परीक्षा देऊ शकतात. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या (Union Ministry of Education) नव्या शैक्षणिक आराखड्यानुसार अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थांना यापुढे दोन भाषा अनिवार्य करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक भाषा भारतीय असायला हवी, अशी अट घालण्यात आली आहे. अकरावीचा विद्यार्थी कोणत्याही शाखेतील (कला, विज्ञान आणि वाणिज्य) एकत्र विषय (Subject) निवडू शकतो. त्यामुळे यापुढे कला, वाणिज्य अथवा विज्ञान शाखा असा झापडबंद मार्ग राहणार नाही. कोणतेही विषय निवडण्याचे स्वातंत्र्य मिळेल. शिक्षण मंत्रालयाच्या (Union Ministry of Education) माहितीनुसार, नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आली आहे. २०२४ च्या शैक्षणिक सत्रासाठी पाठ्यपुस्तके तयार केली जाणार आहेत.
- Secondary and Higher Secondary Board Exams Ministry of Central Education New Educational Paradigm Changes in Board Exams Curriculum Blue Print Academic Year 2024 Freedom in Subject Selection New Textbooks Ministry of Education Decision Transformation in Board Exams Education india schools Arts Science Commerce Streams Freedom in Subject Choice Textbooks for 2024 New Educational Blueprint Academic Session 2024 Secondary and Higher Secondary Students Language Compulsory Requirement Preparation of Academic Blueprint 10th 12th board exams in two phases CBSE board exams in two phases CBSE board exams 2024 New educational policy 2020 Two language policy for 11th and 12th Freedom to choose subjects in 11thMinistry of Education Changes in Exams

Editorial
Next Story
Related News
X
