'अरे वेड्या, मी लपून नाही, जेवणाचे आमंत्रण होते म्हणून गेलेलो…'
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) व उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांची पुण्यातील उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी गुप्त भेट झाल्याची चर्चा आहे.


कोल्हापूर, दि. १५ (वार्ताहर) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची पुण्यातील उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी गुप्त भेट झाल्याची चर्चा आहे. याबाबत एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता अजित पवार संतापले. म्हणाले, 'अरे वेड्या, मी लपून नाही, जेवणाचे आमंत्रण होते म्हणून गेलो होतो. उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापुरात होते. यावेळी त्यांनी माध्यमांना गुप्त भेटीच्या चर्चेवर माहिती दिली. पुण्यातील उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी गुप्त भेट झाल्याची चर्चा आहे. दोघेही शनिवारी दिवसभर पुण्यात होते. त्यामुळे या चर्चेला पुष्टी मिळत होती. जयंत पाटील (Jayant Patil) हेही यावेळी उपस्थित होते. या बैठकीवरुन राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या. या चर्चांवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः त्या दिवशी काय झालं याची माहिती दिली.

