✕
राज्यात पाऊस पुन्हा बरसणार पण १८ ऑगस्टनंतर
By EditorialPublished on
शीरा आलेल्या पावसाने (Rain) जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात जोरदार हजेरी लावली. मात्र, ऑगस्ट महिन्यात पाऊस गायब झाला आहे. पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चिंतेत आहे. मात्र, पावसाचे पुढच्या आठवड्यात पुनरागमन होणार असल्याचे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

x

मुंबई, दि. १४ (प्रतिनिधी) : उशीरा आलेल्या पावसाने (Rain) जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात जोरदार हजेरी लावली. मात्र, ऑगस्ट महिन्यात पाऊस गायब झाला आहे. पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चिंतेत आहे. मात्र, पावसाचे पुढच्या आठवड्यात पुनरागमन होणार असल्याचे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्टनंतर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. हा पाऊस विदर्भातही होईल. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात कोकणात देखील पाऊस कमबॅक करु शकतो. दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात सरासरी पाऊस होईल, असे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत असल्याचे होसाळीकर यांनी ट्विट करून सांगितले आहे. मुंबई शहर आणि उपनगरात गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे. सध्या मुंबईत पावसाची एखाद दुसरी सर होत असून पुढील सात दिवस हीच स्थिती राहणार आहे.

Editorial
Next Story
Related News
X
