✕
'जय शिवराय!', 'सुभेदार' चित्रपटातील कलाकारांसह मरीन ड्राईव्हवर थिरकली तरुणाई
By EditorialPublished on
दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित 'सुभेदार' (Subhedar) चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या ऐतिहासिक चित्रपटाचे कथानक 'सुभेदार तानाजी मालुसरे' यांच्या जीवनावर आधारित आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शनाचा कार्यक्रम पुणे (PUNE) येथे संपन्न झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. यानिमित्ताने चित्रपटातील प्रमुख कलाकारांनी प्रेक्षकांचा उत्साह आणखी वाढवण्यासाठी रविवारी सकाळी मरीन ड्राईव्ह परिसराला भेट दिली. दर रविवारी सकाळी ६ ते ७ वाजल्यापासून मरीन ड्राईव्ह (Marine Driv

सुभेदार : दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित 'सुभेदार' (Subhedar) चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या ऐतिहासिक चित्रपटाचे कथानक 'सुभेदार तानाजी मालुसरे' यांच्या जीवनावर आधारित आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शनाचा कार्यक्रम पुणे (PUNE) येथे संपन्न झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. यानिमित्ताने चित्रपटातील प्रमुख कलाकारांनी प्रेक्षकांचा उत्साह आणखी वाढवण्यासाठी रविवारी सकाळी मरीन ड्राईव्ह परिसराला भेट दिली. दर रविवारी सकाळी ६ ते ७ वाजल्यापासून मरीन ड्राईव्ह (Marine Drive) परिसरात विविध उपक्रम राबवले जातात. या परिसरात मुंबईतील (Mumbai) तरुणवर्ग रविवारी एकत्र जमून विविध गाण्यांवर डान्स करत, गाणी गात, वाद्यवादन करत आपली कला सर्वांसमोर सादर करतात. या उपक्रमात 'सुभेदार' चित्रपटातील कलाकार सहभागी झाले होते. या चित्रपटातील विविध गाण्यांवर डान्स करून कलाकारांनी प्रेक्षकांचा उत्साह वाढवला. सुभेदार चित्रपटातील 'आले मराठे', 'मावळं जागं झालं जी' या गाण्यांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभेदार तानाजी मालुसरे यांचा जयघोष करणारी ही गाणी मरीन ड्राईव्ह परिसरात वाजवण्यात आली. या गाण्यांवर तरुणाईसह अजय पूरकर, चिन्मय मांडलेकर, विराजस कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र हे कलाकार थिरकले. चिन्मय मांडलेकरांनी मरीन ड्राईव्ह परिसरातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी 'जय शिवराय!' अशा कमेंट केल्या आहेत. तर एका युजरने 'दादा, आम्हाला तुमचा अभिमान आहे' अशी प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिली आहे. दरम्यान, 'सुभेदार' चित्रपट येत्या १८ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, स्मिता शेवाळे, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Editorial
Next Story
Related News
X


