Pratahkal - Mumbai news Update - Shinde group broke up! Again a new twister
मुंबई : राष्ट्रवादीसोबतच (NCP) शिवसेनेतही (ShivSena) वेगवान घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मोठी उलथापालथ सुरू आहे. कधी काय होईल याचा नेम लावणेही अशक्य झाले आहे. शिवसेनेच्या शिंदे गटातही अस्वस्थता दिसून येत आहे. बिथरलेल्या खासदार आणि आमदारांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मंगळवारी रात्री उशिरा तडकाफडकी नागपूरहून मुंबईला परतले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठातल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार होते. मुख्यमंत्री मात्र रात्रीच घाईघाईने मुंबईला परतले. ज्या राष्ट्रवादीच्या जाचाला वैतागून बंड केले त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसणे शिंदे गटाला अस्वस्थ वाटत आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदार आणि खासदारांनी थेट नाराजी व्यक्त करत दबावगट निर्माण केल्याने मुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. काल मंत्रालयात शिंदेंची भेट घेत बहुतांश आमदारांनी आपली अस्वस्थता शिंदेंकडे बोलून दाखविली. बहुमत असताना अजित पवारांना सोबत घेण्याची काय गरज होती? असा सवाल करत संजय शिरसाट यांच्यासारख्या आमदारांनी आपली नाराजी उघडपणे माध्यमांसमोर बोलून दाखविली. अजित पवारांचे येणे शिंदे गटातील बऱ्याच आमदारांच्या पचनी पडलेले नाही. त्यामुळे सर्व आमदार आणि खासदार शिंदेच्या शविसेनेत अस्वस्थ असल्याचे पाहायला मिळत आहे, दरम्यान, अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या इतर आमदारांमुळे जुने वाद पुन्हा उफाळून येऊ शकतात, असे शिंदे गटाच्या आमदारांचे म्हणणे असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ नेते सरकारमध्ये सामिल झाले आहेत. आता त्यांना कुठली खाती देण्यात येणार यावरू चर्चा सुरू आहेत. अजित पवारांच्या शपथविधीनंतर शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच काही दिवसांतच शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाऊन अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचे दावे राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांनी केले आहेत.

Editorial

Editorial

Next Story