✕
पुण्यातील ९० टक्के बस थांबे ठरले बिनकामाचे!
By EditorialPublished on
सिंहगड (Sinhagad) रस्त्यावरील बसथांब्यांची दुरावस्था झालेली दिसून येत आहे. थांब्यांच्या छताला गळती, साठलेले पावसाचे पाणी, अस्वच्छता व त्याची दुर्गंधी यासारख्या विविध समस्यांना तोंड देत प्रवासी बसची वाट पाहत आहेत. सिंहगड रस्त्यावरील दत्तवाडीपासून राजाराम पुलादरम्यान दोन्ही बाजूंना मिळून आठ बसथांबे आहेत. येथे बैठक व्यवस्था तोकडी आहे. प्रवासी अधिक आणि बाक कमी असल्याने प्रवाशांना उभेच रहावे लागत आहे.

x
पुणे : सिंहगड (Sinhagad) रस्त्यावरील बसथांब्यांची दुरावस्था झालेली दिसून येत आहे. थांब्यांच्या छताला गळती, साठलेले पावसाचे पाणी, अस्वच्छता व त्याची दुर्गंधी यासारख्या विविध समस्यांना तोंड देत प्रवासी बसची वाट पाहत आहेत.
सिंहगड रस्त्यावरील दत्तवाडीपासून राजाराम पुलादरम्यान दोन्ही बाजूंना मिळून आठ बसथांबे आहेत. येथे बैठक व्यवस्था तोकडी आहे. प्रवासी अधिक आणि बाक कमी असल्याने प्रवाशांना उभेच रहावे लागत आहे. गणेश मळा, पु. ल. देशपांडे उद्यान, बिग बाजार, राजाराम पूल येथील बसथांब्यांवर प्रवाशांची विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
राजाराम पुलाकडून दत्तवाडीकडे येताना पहिल्याच बसथांब्यावर बैठक व्यवस्था आणि छत मोठे आहे; मात्र झाडीझुडपे वाढलेली असल्याने प्रवाशांना सरपटणाऱ्या जीवांचा धोका संभवतो.
या मार्गावरील इतर सर्वच बसथांब्यांची बैठक व्यवस्था आणि छड तोकडे असल्याने जोराचा पाऊस झाल्यास प्रवाशांना भिजण्याशिवाय पर्याय उरत नाही. येथील बऱ्याच बसथांब्यांजवळ पावसाचे पाणी साचून दुर्गंधी पसरते. तसेच कचऱ्याचे ढीगदेखील साचत आहेत, अशी प्रवाशांची भावना आहे.
अनेक बसथांब्यांवर मद्यपी, श्वान आसरा घेत आहेत. जुलै महिन्यापासून या बसथांब्यांची कामे सुरू होतील, असे महापालिकेकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे यंदाचा पावसाळाही बसप्रवाशांना त्याच परिस्थितीत काढावा लागणार हे मात्र नक्की.

Editorial
Next Story
Related News
X
