Pratahkal - News Update - Chandrayaan-3 will be launched on 13th July!
बालासोरदि : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चांद्रयान- ३ (Chandrayaan-3) मिशन १३ जुलै रोजी प्रक्षेपित होणार असल्याची घोषणा केली आहे. भारतीय अंतराळ संस्थेचे (इस्त्रो) प्रमुख एस सोमनाथ यांनी याची पुष्टी केली. सोमनाथ म्हणाले की, प्रक्षेपण १३ जुलै रोजी होणार आहे. परंतु वातावरणातील बदल पाहून ही मोहीम १९ जुलैपर्यंत पुढे जाऊ शकते.
यावेळी आम्ही चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करू शकू. १३ जुलै हा पहिला संभाव्य प्रक्षेपण दिवस आहे. यापूर्वी, सोमनाथ म्हणाले होते की १२ जुलै ते १९ जुलै दरम्यानचा कालावधी प्रक्षेपणासाठी उत्तम आहे. परंतु आता सर्व बाजू तपासून पाहून १३ जुलै हा दिवस नक्की करण्यात आला आहे.


Next Story