✕
महाराष्ट्राचा चिखल झाला : राज ठाकरे
By EditorialPublished on
सत्तेच्या या खेळावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackreay) यांनी सडकून टीका केली आहे. आज महाराष्ट्राचा (Maharashtrian) सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील 'दिगू टिपणीस' झाला. राज्यातील किळसवाणं राजकारण (Politics) जनता येत्या निवडणुकीत बंद पाडणार का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.

x

मुंबई : सत्तेच्या या खेळावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackreay) यांनी सडकून टीका केली आहे. आज महाराष्ट्राचा (Maharashtrian) सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील 'दिगू टिपणीस' झाला. राज्यातील किळसवाणं राजकारण (Politics) जनता येत्या निवडणुकीत बंद पाडणार का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. महाराष्ट्रात पुढे अजून काय पाहावं लागेल हा विचार करुन मन धस्स होत असल्याचंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना (Sharad Pawar) उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडल्याचं राज ठाकरे म्हणाले. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तसंही सध्या शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व महाराष्ट्र भाजपला रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधल्याचं राज ठाकरे म्हणाले. ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करुन मनात धस्स होतं, असंही राज ठाकरे म्हणाले. बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार? असा महत्त्वाचा प्रश्न देखील राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
Next Story
Related News
X

