Pratahkal - Marathi News Update - The Kanjoor Metro Carshed site belongs to the State Govt

मुंबई : कांजूर (Kanjoor) येथील मेट्रो (Metro) कारशेडसाठी निवडलेली जागा राज्य सरकारचीच (Government) असल्याची माहिती आज विधान परिषतदेत सरकारने दिली. यामुळे कांजूर येथील ही जागा केंद्र सरकारची असल्याबाबतचा संभ्रम अखेर दूर झाला आहे. आरे येथील मेट्रो कारशेड कांजूर येथील जागेत करण्यात यावे अशी मागणी 'आरे वाचवा' मोहिमेतील कार्यकर्ते, पर्यावरणवाद्यांनी केली होती. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आरेतील कारशेडला स्थगिती देऊन कांजूर येथील जागेवर कारशेड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मविआ सरकारच्या या निर्णयावर भाजपने (BJP) जोरदार टीका केली होती.
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत कांजूर येथील जागेबाबत तारांकित प्रश्न विचारला होता. राज्य सरकारकडून विधान परिषदेतील तारांकित प्रश्नाला लेखी उत्तर देण्यात आले. त्यात ही जमीन राज्य सरकारची असल्याची कबुली सरकारने दिली.
विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्या २१ मे २०१५चा आदेशानुसार आणि १ नोव्हेंबर २०१८चा तत्कालीन महसूल मंत्र्यांच्या आदेशानुसार कांजूर मेट्रो कारशेडची जागा राज्य शासनाची झाल्याचं उत्तरातून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या जागेवर राज्य सरकार, केंद्र सरकार व एका खासगी व्यक्तीने दावा केला होता. हे प्रकरण हायकोर्टापर्यंत गेले होते. यात हायकोर्टाने खासगी व्यक्तीचा दावा हा खोडून काढला होता.
विधान परिषदेत सरकारने कांजूरच्या जागेबाबत लेखी उत्तर दिल्यानंतर शिवसेना ठाकरे (Shivsena Thackeray) गटाचे आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आदित्य यांनी म्हटले की, मेट्रोची जागा कांजूरला घेऊन जात होतो. पैसे वाचले असते. वेळ वाचला असता आणि आज कारशेड पूर्ण झाली असती असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. हे सगळं ठाण्यातून कोण करत होत यात जायचं नाही असं सूचक वक्तव्य ही त्यांनी केले. कांजूर येथे मेट्रो कारशेड उभारले असते तर चार मेट्रो लाईन एकत्र झाले असते.
मेट्रो बाबत विरोधकांनी राजकारण का केले गेले असा सवाल केला. विरोधकांनी राजकारण केलं नसतं तर आज आरे वाचलं असतं असेही त्यांनी म्हटले.
Editorial

Editorial

Next Story