✕
अख्खा भाजप माझ्याविरुद्ध : उद्धव ठाकरे
By EditorialPublished on
'आज अख्खा भाजप (BJP) माझ्याविरुद्ध आहे,' असे ठाकरे (Thackeray) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले आहे. पक्ष, नाव, चिन्ह चोरले, तरी देखील तुम्हाला उद्धव ठाकरेंची भीती वाटते असा सवाल विचारत उद्धव ठाकरे ही एकटी व्यक्ती नाही तर उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे विचार आहेत, असा दावा त्यांनी केला.

x

मुंबई : 'आज अख्खा भाजप (BJP) माझ्याविरुद्ध आहे,' असे ठाकरे (Thackeray) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले आहे. पक्ष, नाव, चिन्ह चोरले, तरी देखील तुम्हाला उद्धव ठाकरेंची भीती वाटते असा सवाल विचारत उद्धव ठाकरे ही एकटी व्यक्ती नाही तर उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे विचार आहेत, असा दावा त्यांनी केला. 'आवाज कुणाचा' या पॉडकास्ट मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही मुलाखत घेतली असून आज या मुलाखतीचा दुसरा आणि अखेरचा भाग प्रकाशित झाला. उद्धव ठाकरे म्हणाले की, 'एकेकाळी शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला दोघांना वाचवलं होतं. माननीय पंतप्रधान मोदी आणि अमित शहांना... त्याचे पांग तुम्ही असे फेडताय का? आणि मला संपवण्यात तुम्हाला आनंद मिळत असेल तर तुम्ही संपवा. बघू या माझ्या वडिलांचे आशीर्वाद, जनतेची सगळी साथसोबत आणि तुमची ताकद माझ्या पाठिशी आहे,' असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 'मी शिवसेनाप्रमुखांच्या मार्गाने चालणारा आहे. त्यामुळे आमने-सामने करणारा मी आहे. जशास तसं उत्तर देणारा मी आहे. 'अरे' ला 'कारे' करणारा आहे. त्यामुळे मी लढतोय,' असंही त्यांनी म्हटलं.
Next Story
Related News
X

