✕
राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांना कोळसा घोटाळा प्रकरणी चार वर्षांची शिक्षा
By EditorialPublished on
राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा (Vijay Darda) यांना कोळसा घोटाळा प्रकरणी ४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विजय दर्डा यांना तुरुंगवास, मुलगा देवेंद्र दर्डा यांना चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर जेएलडी यवतमाळ (JLD Yavatmal) एनर्जी प्रा. लि. चे संचालक मनोजकुमार जयस्वाल (Manoj Kumar Jaiswal) यांना चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

x

नवी दिल्ली : राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा (Vijay Darda) यांना कोळसा घोटाळा प्रकरणी ४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विजय दर्डा यांना तुरुंगवास, मुलगा देवेंद्र दर्डा यांना चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर जेएलडी यवतमाळ (JLD Yavatmal) एनर्जी प्रा. लि. चे संचालक मनोजकुमार जयस्वाल (Manoj Kumar Jaiswal) यांना चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याच प्रकरणात निवृत्त कोळसा सचिव एच. सी. गुप्ता, दोन ज्येष्ठ अधिकारी के एस क्रोफा आणि के सी समरीया यांना तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. १९९९ ते २००५ या कालावधीमध्ये जेएलडी यवतमाळ यांना जे जुने ब्लॉक देण्यात आले होते त्याची माहिती लपवून पुन्हा युपीए सरकारच्या काळामध्ये गैरमार्गाने कंत्राट मिळावल्याचा आरोप होता. युपीए सरकारच्या काळात गाजलेल्या घोटाळ्यांमध्ये घोटाळ्याचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. या प्रकरणातील ही तेरावी शिक्षा आहे. या संदर्भात पंतप्रधान मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांना लिहिलेल्या पत्रात माहिती लपवण्याचा आरोप करण्यात आला होता. याच आधारावर ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. छत्तीसगडच्या कोळसा घोटाळ्यात अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. या प्रकरणात अनेक बडे अधिकारी आणि राजकारण्याशी संबंध असलेले अनेक जण रायपूर तुरुंगात कैद आहेत. यात आयएएस अधिकारी समीर बिश्नोई, सौम्या चौरसिया, मुख्यमंत्र्यांचे उपसचिव, सूर्यकांत तिवारी, कोळसा घोटाळ्यात सिंडिकेट म्हणून काम करणारे सुनील अग्रवाल यांचा समावेश आहे.

Editorial
Next Story
Related News
X
