Pratahkal - Marathi News Update -Senior journalist, writer Shirish Kanekar passed away
मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, लेखक (Senior Journalist, Writer)शिरीष कणेकर (Shirish Kanekar) यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन (Death) झाले. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिरीष कणेकर यांची आज सकाळी प्रकृती खालावली. यानंतर त्यांना मुंबईतील (Mumbai) हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शिरीष कणेकर यांच्या निधनाने सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे.
पत्रकार, चित्रपट व क्रिकेट समीक्षक, ललित लेखक, एकपात्री कलाकार अशी ओळख असलेल्या शिरीष कणेकर यांचा जन्म ६ जून १९४३ रोजी पुण्यात झाला. रायगड जिल्ह्यातील पेण हे त्यांचे मूळ गाव आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठात कायद्याची पदवी घेतली. इंडियन एक्प्रेस, डेली, फ्री प्रेस जर्नल, सिंडिकेटेड प्रेस न्यूज एजन्सी यासाठी शिरीष कणेकरांनी काम केले.
सिनेमा, क्रिकेट आणि राजकारण या विषयांवर त्यांचे लेखन प्रसिद्ध होते. माझी फिल्लमबाजी, कणेकरी ही पुस्तके आणि कथाकथनाचे त्यांचे कार्यक्रम प्रसिद्ध झाले. यादों की बारात, शिरीषासन, सिनेमाबाजी, मुद्दे आणि गुद्दे, चहाटळकी, सूर पारंब्या, कणेकरी, लगाव बत्ती, आसपास, मेतकूट, चित्ररुप, फिल्लमबाजी, कल्चर व्हल्चर या नावांनी त्यांनी स्तंभलेखन केले.

Editorial

Editorial

Next Story