✕
इर्शाळवाडीत आतापर्यंत वीस मृत्यू, आठ जखमी
By EditorialPublished on
सर्व प्रकारच्या यंत्रणा हाताशी असूनही प्रतिकूल वातावरणामुळे त्याचा उपयोग करू शकलो नाही याची खंत वाटते अशी भावना व्यक्त करतानाच राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील लोकांचं पुनर्वसन सुरक्षित स्थळी करण्यासाठी आराखडा केला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत (Legislative Assembly) दिली.
मुंबई : सर्व प्रकारच्या यंत्रणा हाताशी असूनही प्रतिकूल वातावरणामुळे त्याचा उपयोग करू शकलो नाही याची खंत वाटते अशी भावना व्यक्त करतानाच राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील लोकांचं पुनर्वसन सुरक्षित स्थळी करण्यासाठी आराखडा केला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत (Legislative Assembly) दिली. इर्शाळवाडीत (Irshalwadi) मध्ये काल झालेल्या दुर्घटनेनंतर आज त्यांनी सभागृहात निवेदन केलं. ४८ घरे असलेल्या वाडीतील १७/१८ घरांवर कडा कोसळून हा अपघात झाला. त्यात वीस जणांचा मृत्यू झाला, आठ जखमी झाले आहेत, १०९ लोक सुरक्षित सापडले आहेत, उर्वरित लोकांचा शोध सुरू आहे, असं ते म्हणाले. या वाडीतील अनेक जण इतरत्र कामाला जातात, शेती करतात त्यामुळे नेमके किती लोक त्यावेळी तिथे होते याची माहिती घेतली जात आहे. मृतदेहांवर घटनास्थळाजवळच अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्यात आली आहे. सर्वच्या सर्व ४७ कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यांना सिडको मार्फत घरे बांधून दिली जातील. तोवर त्यांची व्यवस्था स्वतंत्र कंटेनर मध्ये करण्यात आली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
Next Story
Related News
X



