✕
मृत झालेल्यांचे वारस व जखमींच्या उपचाराची जबाबदारी राज्य सरकारची
By EditorialPublished on
रायगड (Raigad) जिल्ह्यातील खालापूरनजिक मध्यरात्री दरड कोसळल्यामुळे अख्खे गाव उद्धवस्त झाले आहे. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले व मृत झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी या घटनेत जखमी झालेल्या सर्वांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार असून मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकार योग्य ती मदत करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

x

पुढे ते म्हणाले, काल मध्यरात्रीपासूनच या घटनेबाबत कळताच मी स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्कात आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल व जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Editorial
Next Story
Related News
X