✕
पावसाने झोडपले! मुंबईसह ठाण्याला ऑरेंज अलर्ट
By EditorialPublished on
मुंबईत (Mumbai) सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. मुंबईत मंगळवारपासूनच पावसाने हजेरी लावली असून आज, बुधवारी पावसाचा जोर वाढवला. मुंबईत पुढच्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

x
मुंबई : मुंबईत (Mumbai) सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. मुंबईत मंगळवारपासूनच पावसाने हजेरी लावली असून आज, बुधवारी पावसाचा जोर वाढवला. मुंबईत पुढच्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईसह ठाणे (Thane) आणि रत्नागिरीलाही ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. रायगड, पालघर, पुणे (Pune) आणि सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापूर, ठाणे, नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
मुंबईसह राज्यात एनडीआरएफ (NDRF) आणि प्रशासन सज्ज झालं आहे. महाराष्ट्रात एनडीआरएफच्या एकूण १२ तुकड्या कार्यरत आहेत. यामध्ये मुंबई आणि नागपुरातील रिजनल रिस्पॉन्स सेंटरवर एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबईत एनडीआरएफच्या एकूण ५ टीम तैनात करण्यात आल्याची माहिती एनडीआरएफने दिली आहे. यासोबतच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात देखील एनडीआरएफ तैनात करण्यात आलं आहे. यामध्ये पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, नागपूर आणि ठाण्यात एनडीआरएफ तैनात पथकं सज्ज आहेत.

Editorial
Next Story
Related News
X
