Pratahkal - Marathi News Update - Kalyan-Kasara, Kalyan-Karjat railway services stopped
मुसळधार मुंबईतील (Mumbai) पावसामुळे (Rain) कल्याण-कसारा (Kalyana-Kasara)आणि कल्याण- कर्जत रेल्वे सेवा (Kalyan-Karjat Railway Service) बंद आहे. यामुळे मुंबईची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. परिणामी प्रवाशांचे हाल होत आहे.
मध्य रेल्वेने याबाबत माहिती देत सांगितले की, मुसळधार पावसामुळे कल्याण स्था १४.४० वाजेपासून पॉईंट निकामी झाले. तांत्रिक बिघाडामुळे कल्याणहून कसारा बाजूने जाणाऱ्या आणि कसारा बाजूने येणाऱ्या गाड्या बंद आहेत. दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने वाहतूक पूर्ववत करण्यात अडथळे येत असल्याचं सांगितलं जात आहे. पावसाचा हार्बर रेल्वेलाही मोठा फटका बसला आहे. पनवेल ते कुर्ला दरम्यान वाहतूक ठप्प झाली होती, पण दुपारनंतर वाहतूक सुरु झाली असली तरी रेल्वे सेवा संथ गतीने सुरु आहे.
Editorial

Editorial

Next Story