✕
महाराष्ट्रात उद्योगस्नेही इकोसिस्टीमचे काम जलद गतीने - केंद्रीय मंत्री पियुष गोयल
By EditorialPublished on
केंद्रीय वाणिज्य आणि वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) म्हणाले की, महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. महाराष्ट्रातील इकोसिस्टीमचे काम गतीने होत आहे. जलद गतीने पायाभूत सुविधा वाढत आहेत. कोस्टल रोडचे काम चालू आहे. ट्रान्स हार्बर लिंक अंतिम टप्प्यात आहे.

x

केंद्रीय वाणिज्य आणि वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) म्हणाले की, महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. महाराष्ट्रातील इकोसिस्टीमचे काम गतीने होत आहे. जलद गतीने पायाभूत सुविधा वाढत आहेत. कोस्टल रोडचे काम चालू आहे. ट्रान्स हार्बर लिंक अंतिम टप्प्यात आहे. मुंबई (Mumbai) ते पुणे (Pune) हे अंतर दोन तासामध्ये पार पडेल यासाठीची योजना अंतिम टप्प्यात आहे. मेट्रो, समृद्धी महामार्ग तसेच इतर दळणवळणाच्या सुविधा राज्यात उपलब्ध होत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे 'पीएम मित्रा' पार्कसाठी पत्रव्यवहार करून त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला याचा त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आत्मनिर्भर भारताच्या उभारणीची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीकोनातून तसेच जागतिक वस्त्रोद्योगास चालना देण्यासाठी या 'पीएम मित्रा' पार्क च्या उभारणीला मंजुरी दिली आहे. ३.५ ट्रिलियन डॉलर वरून ३५ ट्रिलियन डॉलर इकॉनोमी वाढवण्यासाठी भारत विकासाच्या दृष्टीने पावले टाकत आहे. देशातील युवा -युतीना सोबत घेऊन चांगल्या गुणवत्तेसोबत देशाचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी यावेळी केले.
Next Story
Related News
X

