✕
शरद पवारांच्या पत्नीची प्रकृती बिघडली
By EditorialPublished on
राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पत्नी प्रतिभा पवार (Pratibha Pawar) यांना मुंबई येथील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही शस्त्रक्रिया नेमकी कोणत्या कारणास्तव आणि कोणत्या प्रकारची आहे, याबाबत माहिती मिळू शकली नाही.

x

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पत्नी प्रतिभा पवार (Pratibha Pawar) यांना मुंबई येथील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही शस्त्रक्रिया नेमकी कोणत्या कारणास्तव आणि कोणत्या प्रकारची आहे, याबाबत माहिती मिळू शकली नाही. शरद पवार हे सुद्धा तातडीने ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल झाल्याचे समजते. मागिल काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीमुळे पवार कुटुंबीय जोरदार चर्चेत आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ही अत्यंत महत्त्वाची आणि खळबळजनक घडामोड मानली जात आहे. खास करुन गेली अनेक दशके राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शरद पवार यांच्यासाठी हा अत्यंत मोठा धक्का मानला गेला आहे.
अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर अजित पवारांना धडा शिकवण्यासाठी आणि पक्षात सुरु असलेली पडझड थोपवण्यासाठी स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहीत पवार राज्यात जंगजंग फिरुन कार्यकर्त्यांना आपली भूमिका सांगताहेत. असे असले तरी प्रतिभा पवार यांनी मात्र केव्हाही राजकीय महत्त्वाकांक्षा दाखवली नाही. इतकेच नव्हे तर राजकीय कार्यक्रमांनाही त्या फारशा उपस्थित नसतात. अपवादात्मक स्थितीमध्ये त्या शरद पवार यांच्या सोबत किंवा स्वतंत्रपणे केव्हातरीच त्या अशा कार्यक्रमांना उपस्थित राहतात. मितभाषी स्वभाव आणि कामातील नीटनेटकेपणा ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. यादरम्यान पुन्हा एकदा या वयात शरद पवार यांचे पावसात भिजल्याचे फोटो पाहून त्यांची पत्नी प्रतिभा पवार या काळजीने त्रस्त झाल्या आहेत. त्या काळजीपोटीच त्यांची प्रकृती बिघडल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

Editorial
Next Story
Related News
X
