✕
गुंतवणूक करा, 'भारत मॉडल ऑफ डाइवर्सिटी' पॅरिसमध्ये पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
By EditorialPublished on
भारतामध्ये (India) गुंतवणूक (Investment) करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी फ्रान्समध्ये (France) राहणाऱ्या भारतीय समुदायाला केले. ते पॅरीसमध्ये (Paris) बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयावर भाष्य केले. दहशतवाद आणि कट्टरवादावरही त्यांनी भाष्य केले. परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी भारत सरकार कमिटेड असल्याचा विश्वासही यावेळी मोदींनी व्यक्त केला.

पॅरिस : भारतामध्ये (India) गुंतवणूक (Investment) करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी फ्रान्समध्ये (France) राहणाऱ्या भारतीय समुदायाला केले. ते पॅरीसमध्ये (Paris) बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयावर भाष्य केले. दहशतवाद आणि कट्टरवादावरही त्यांनी भाष्य केले. परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी भारत सरकार कमिटेड असल्याचा विश्वासही यावेळी मोदींनी व्यक्त केला. फ्रान्समध्ये पोस्ट मास्टर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना भारताकडून पाच वर्षांसाठी पोस्ट स्टडी व्हिसा देण्यात येईल, असेही मोदींनी यावेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या फ्रान्सच्या दौऱ्यावर असून त्यांचे पॅ रिसमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर स्वागत केले. तसेच पंतप्रधान मोदी यांना यावेळी गार्ड ऑफ ऑनर देखील देण्यात आला. प्रतिष्ठित ला सीन म्युझिकलमध्ये भारतीय समुदायाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. आजचे दृश्य स्वत:च अप्रतिम आहे, हा उत्साह अभूतपूर्व आहे, हे स्वागत आनंदाने भरून जाणार आहे, असे मोदी यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज जग एका नव्या जागतिक व्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. भारताची भूमिका झपाट्याने बदलत आहे. भारत लोकशाहीची जननी आहे. भारत मॉडेल ऑफ डायवर्सिटी (विविधतेचा आदर्श) आहे. दहशतवाद आणि कट्टरतावादाविरोधात भारताचे प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. जगाला प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी भारताचे मदतीचे प्रयत्न आहेत. भारताचा हजारो वर्षांचा इतिहास आहे. जागतिक कल्याणासाठी भारताच्या प्रयत्नांची व्याप्ती खूप मोठी आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समध्ये असणाऱ्या भारतीयांना भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, माझा तुम्हाला आग्रह आहे की, आता आपल्याला भारतात गुंतवणुकीसाठीही संपूर्ण उत्साहाने समोर यावे लागेल. पुढील २५ वर्षांत भारत विकसित होण्याच्या दृष्टीने काम करत आहे. यामध्ये तुमची भूमिकाही मोठी आहे. आपण ज्या कोणत्या क्षेत्रात काम करत असाल. त्याच्याशी संबंधित संभावनांवर भारतात काम करा. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करा.. भारतामध्ये गुंतवणूक करण्याची मोठी संधी आहे. जो लवकर भारतात गुंतवणूक करेल, त्याला जास्त फायदा होईल. लाल किल्ल्यावरील भाषणातही मी हेच आवाहन केले होते. पुन्हा एकदा भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन करत आहे.

Editorial
Next Story
Related News
X


