Pratahkal - Marathi News Update - Prime Minister Modi is welcomed in Paris
पॅरिस : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे पॅरिसच्या (Paris) विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न (French PM Elisabeth Bourne) यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर स्वागत केले. तसेच पंतप्रधान मोदी यांना गार्ड ऑफ ऑ नर देखील देण्यात आले. दरम्यान यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची देखील भेट घेणार आहेत.
भारत आणि फ्रान्सच्या यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण समजला जात आहे. तसेच त्यांच्या या दौऱ्यामधून अनेक अपेक्षा देखील ठेवण्यात आलेल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी त्यांचा हा दौरा दोन्ही देशांच्या भविष्यासाठी नव्या दिशा ठरणार असेल असा विश्वास व्यक्त केला आहे. दोन्ही देशांतील धोराणात्मक भागीदारीला २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. याविषयी बोलतांना पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, 'या वर्षी दोन्ही देशातील धोराणात्मक भागीदारीला २५ वर्ष पूर्ण होत आहेत. विश्वास आणि संकल्पाने निर्माण झालेल्या या धोराणात्मक भागीदारीने देशांचे संरक्षण, अंतराळ, व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, संस्कृती यांसारख्या विविध क्षेत्रात महत्त्वाचे सहकार्य केले आहे.'

Editorial

Editorial

Next Story