✕
चीन आणि पाकिस्तानने घेतला भारताचा धसका !
By EditorialPublished on
भारताची ताकद आणखी वाढली असून २६ राफेल - एम विमान (26 Rafale - M aircraft), ३ स्कॉर्पिन पाणबुड्यांसह भारताचा फ्रान्ससोबत ९० हजार कोटी रुपयांचा करार झाल्यामुळे शत्रू राष्ट्र चीन (China) आणि पाकिस्तानला (Pakistan) धसका बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आजपासून दोन दिवसीय फ्रान्स (France) दौऱ्यावर आहेत.

x
पॅरिस : भारताची ताकद आणखी वाढली असून २६ राफेल - एम विमान (26 Rafale - M aircraft), ३ स्कॉर्पिन पाणबुड्यांसह भारताचा फ्रान्ससोबत ९० हजार कोटी रुपयांचा करार झाल्यामुळे शत्रू राष्ट्र चीन (China) आणि पाकिस्तानला (Pakistan) धसका बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आजपासून दोन दिवसीय फ्रान्स (France) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी त्यांनी फ्रान्ससोबतच्या महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. यामुळे भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढणार आहे. फ्रान्स आणि भारताच्या धोरणात्मक संबंधांना २५ वर्ष पूर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदी यांना नॅशनल बास्तील परेडसाठी प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले. या दौऱ्यावर भारत आणि फ्रान्स यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्यावर चर्चा होणार आहे. पंतप्रधान मोदी सहाव्यांदा फ्रान्स दौऱ्यावर आहेत. फ्रान्स दौऱ्यावेळी पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्ससोबत ९० हजार कोटींच्या संरक्षण क्षेत्रासंबंधित करार होण्याची अपेक्षा आहे. या डिफेन्स डीलमध्ये भारताला २२ सिंगल सीट राफेल मरीन लढाऊ विमाने मिळणार आहेत. ही लढाऊ विमाने आयएनएस विक्रांतवर तैनात करण्यात येतील. त्याचबरोबर ४ ट्रेनर राफेल मरीन विमाने उपलब्ध होणार आहेत. यासोबतच भारतात ३ स्कॉर्पिन पाणबुड्यांच्या संयुक्त बांधणीवरही चर्चा होऊ शकते.
या संरक्षण कराराअंतर्गत भारताला फ्रान्सकडून २६ राफेल- एम ही समुद्री लढाऊ विमानं मिळणार आहेत. त्याशिवाय तीन स्कार्पिन श्रेणीतील पाणबुड्याही भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील होणार आहेत. इंडो- पॅसिफिक सागरी क्षेत्रात चीनच्या हालचाली वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नौदलाची ताकद वाढवण्यासाठी राफेल विमानं खरेदी करण्यात आले असून लवकरच ही विमानं भारतीय नौदलात सामील होतील. भारतीय नौदल आयएनएस विक्रांत युद्धनौकेवर २६ राफेल - एम विमानं तैनात करणार आहे, त्यामुळे शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवून त्यांना चोख प्रत्यत्तर देता येईल. याचा धसका दोन्ही शत्रू राष्ट्रांनी घेतला आहे.
Next Story
Related News
X

