✕
राज्य आपत्ती निवारणासाठी केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वाधिक निधी
By EditorialPublished on
ओला दुष्काळ, पूरग्रस्तांना किंवा पावसाळ्यातील हानी भरुन काढण्यासाठी केंद्र सरकारकडून (Central Government) आज देशातील २२ राज्यांना आपत्ती निवारणासाठी ७ हजार ५३२ कोटी रुपयांचा निधी (Funds) देण्यात आला. त्यामध्ये, सर्वाधिक निधी महाराष्ट्र सरकारला (Government of Maharashtra) देण्यात आला आहे.

x
नवी दिल्ली : ओला दुष्काळ, पूरग्रस्तांना किंवा पावसाळ्यातील हानी भरुन काढण्यासाठी केंद्र सरकारकडून (Central Government) आज देशातील २२ राज्यांना आपत्ती निवारणासाठी ७ हजार ५३२ कोटी रुपयांचा निधी (Funds) देण्यात आला. त्यामध्ये, सर्वाधिक निधी महाराष्ट्र सरकारला (Government of Maharashtra) देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाकडून हा निधी आजच वितरीत करण्यात आला आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला सर्वाधिक निधी दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. केंद्र सरकारने आपत्ती निवारणासाठी २२ राज्यांना आज निधी वाटप केला असून महाराष्ट्राला सर्वाधिक १४२०.८० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या यादीत उत्तर प्रदेश राज्य दुसऱ्या क्रमांकावर असून ओडिशाचा तिसरा क्रमांक लागतो. उत्तर प्रदेशला ८१२ कोटी रुपयांना निधी वितरीत (Disbursement Of Funds) करण्यात आला असून ओडिशाला ७०७.६० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं होम स्टेट असलेल्या गुजरातला राज्य आपत्ती निवारणासाठी ५८४ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
सध्या मोठ्या प्रमाणात पावसाने हाहाकार माजलेल्या हिमाचल प्रदेशसाठी १८०.४० कोटी तर उत्तराखंडसाठी ४१३.२० कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. या यादीत सर्वात कमी निधी गोवा सरकारला देण्यात आला असून केवळ ४.८० कोटी रुपये गोवा राज्यातील आपत्ती निवारणासाठी देण्यात आले आहे.

Editorial
Next Story
Related News
X
