Pratahkal - Marathi News Update - Lack of communication in Thackeray faction: Neelam Gorhe
मुंबई : मी कोणतेही पद डोळ्यासमोर ठेऊन शिंदे (Shinde) गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला नसल्याचे वक्तव्य विधान परिषदेच्या (Legislative Council) उपसभापती आणि शिवसेना (Shivsena) शिंदे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी केले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मी त्यांना पत्र दिले होते. लोकांना त्यांनी भेटावे यासंदर्भात मी त्यांनी सांगितल्याचे निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) म्हणाल्या. जेवढी लोकांची अपेक्षा आहे, तेवढा वेळ उद्धव साहेबांनी दिला नाही. ठाकरे गटात संवादाचा अभाव असल्याचे गो यावेळी म्हणाल्या. निलम गोऱ्हे एबीपी माझाच्या कट्ट्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर संवाद साधला.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर आणि आजारी पडल्यानंतर चर्चेची दार बंद झाल्याचे गोन्हे म्हणाल्या. आता त्यांना जास्त त्रास द्यायला नको म्हणून मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतल्याचे गोऱ्हे म्हणाल्या. पक्षाने मला खूप काही दिले, प्रवक्ता केलं, उपसभापती केलं. पण महत्त्वाच्या निर्णयावेळी मत विचारात घेतलं जातं नव्हतं असेही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
उद्धव साहेब मुख्यमंत्री व्हावे ही माझी इच्छा होती. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्ष संघटनेत गती येईल असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर एवढं बंदिस्त राजकारण होईल असं वाटलं नव्हते.
त्यांचे पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष झाले. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मातोश्रीवर बोलावले तर मी जाईन. मात्र आता त्यांच्या गटात प्रवेश करणार नसल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले.

Editorial

Editorial

Next Story