Pratahkal - News Update - Shocking Thackeray, Neelam Gorhe joined the Shinde group
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेत (Legislative Council) शिवसेना शिंदे गटाची (Shiv Sena belongs to the Shinde group) संख्या वाढण्यासाठी झालेल्या प्रयत्नात त्यांना मोठे यश आले असून उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वावर त्यांनी विश्वास ठेवत हा प्रवेश केल्याचे सांगितले आहे.
शिवसेनेत फूट पडल्यावर विधानसभेतील (Legislative Assembly) चाळीस आमदार त्यांच्यासोबत आले होते. मात्र विधान परिषदेच्या एकाही आमदाराने त्यांना पाठिंबा दिला नव्हता. सुरुवातीला विप्लव बाजोरिया मग मनिषा कायंदे आणि आता उपसभापती डॉ. नीलम गो-हे असे तीन आमदार आता त्यांच्या गटात दाखल झाले असून उध्दव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यांची संख्या सभागृहात तीनने खाली आली असून त्यांना विरोधी पक्षनेते पद गमवावे लागणार आहे.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे चांगले काम सुरू असून अयोध्येतील राम मंदिर, तलाक पीडित महिलांना न्याय, काश्मीर मध्ये ३७० कलम हटविणे आणि समान नागरी कायदा हे त्यातूनच घडत आहे. याशिवाय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना अधिकृत असल्याचा निर्वाळा दिला आहे.
त्यामुळे आपण शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युतीत सहभागी होत असल्याचे निवेदन डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी प्रसिध्द केले आहे.
डॉ. गोऱ्हे यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करीत नंतर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली...
Editorial

Editorial

Next Story