✕
८३ वर्ष वयाचा पुन्हा-पुन्हा उल्लेख, आम्ही लक्ष देत नाही देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका
By EditorialPublished on
राष्ट्रवादीत (Nationalist) उभी फूट पडण्याआधीपासूनच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात वाकयुद्ध सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पवारांना औरंगाबादचं (Aurangabad) नामकरण (Naming) छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) मान्य नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार यांच्या वयावरुन पुन्हा एकदा टीका केली आहे.

मुंबई : राष्ट्रवादीत (Nationalist) उभी फूट पडण्याआधीपासूनच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात वाकयुद्ध सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पवारांना औरंगाबादचं (Aurangabad) नामकरण (Naming) छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) मान्य नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार यांच्या वयावरुन पुन्हा एकदा टीका केली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेशावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना ते बोलत होते. वयाचा उल्लेख करुन लोकांची सहानुभूती मिळवण्याचा काही लोकांचा प्रयत्न असल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार यांच्यावर सरळ शब्दात टीकास्त्र साधले. ते म्हणाले, आमच्या त्यांना (शरद पवार) शुभेच्छा, त्यांना शंभर वर्ष आयुष्य लाभो, त्यांना जोपर्यंत राजकारण करायचे तेवढे त्यांना करायला मिळो. परंतु ८३ वर्ष वयाचा पुन्हा-पुन्हा उल्लेख करून त्यांचे काही कार्यकर्ते लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही त्याकडे लक्ष देत नसल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. जसं शरद पवारांनी जाहीर केलं तसं अजित पवारांनी देखील जाहीर केलं की तेही सभा घेतील. सभा तर आम्ही पण घेत आहोत. राज्यात दर एक किंवा दोन दिवस आड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) किंवा माझी सभा असते. आमच्या सभेलाही नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. ही लोकशाही आहे, लोकशाहीत सभा घेण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्या दृष्टीने ते सभा घेत असतील तर त्यात चर्चा करण्यासारखे काही नसल्याचे फडणवीस म्हणाले.

Editorial
Next Story
Related News
X


