✕
'बाईपण भारी देवा'ने एका आठवड्यात कमावले १२.५० कोटी
By EditorialPublished on
'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या चित्रपटाची (Film) सध्या जोरदार चर्चा आहे. केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ३० जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाचे सगळे शो हाउसफुल होत आहेत. या चित्रपटाने एका आठवड्यात चांगली कमाई केली. त्यानिमित्त मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय गायिकेने या चित्रपटाच्या टीमला एक खास सरप्राईज दिलं आहे.

x

बाईपण भारी देवा : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या चित्रपटाची (Film) सध्या जोरदार चर्चा आहे. केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ३० जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाचे सगळे शो हाउसफुल होत आहेत. या चित्रपटाने एका आठवड्यात चांगली कमाई केली. त्यानिमित्त मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय गायिकेने या चित्रपटाच्या टीमला एक खास सरप्राईज दिलं आहे.
या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट म्हणजे सहा बहिणींची कथा आहे. या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात १२.५० कोटींची कमाई केली. त्यानिमित्त या चित्रपटाची पार्श्वगायिका सावनी रविंद्र हिने या चित्रपटाच्या टीमला एक सरप्राईज दिलं.
सावनीने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात १२.५० कोटींची कमाई केल्याच्या निमित्ताने जिओ स्टुडिओच्या ऑ फिसमध्ये जाताना सावनी छानसा बुके आणि एक केक घेऊन गेली, असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तर तिथे गेल्यावर तिचं हे सरप्राईज सर्वांनाच आवडलं. या चित्रपटाची संपूर्ण टीम तिथे उपस्थित होती. सावनीने आणलेला केक कापून त्यांनी सेलिब्रेशन केलं. सावनीच्या या अंदाजाने सर्वांचं लक्ष वेधलं असून तिचा हा उत्साह आणि टीमबद्दल वाटणारं प्रेम याचं सर्वजण कौतुक करत आहेत. तर याचबरोबर या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी हा चित्रपट खूप आवडल्याचं सांगत आहेत.

Editorial
Next Story
Related News
X
