✕
शिंदे-फडणवीस सरकारची वर्षपूर्ती, अशी राहिली सरकारची कामगिरी
By EditorialPublished on
राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले आहेत. एक वर्षांपूर्वी शिंदे फडणवीस सरकारने सत्ता स्थापन केली. मात्र, ही सत्ता स्थापन करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये ऐतिहासिक बंड झाले. या बंडाच्या परिणामी महाविकास आघाडी सरकार कोसळलं.

मुंबई : राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला (Shinde Fadnavis Government) आज एक वर्ष पूर्ण (Complete One Year) झाले आहेत. एक वर्षांपूर्वी शिंदे फडणवीस सरकारने सत्ता स्थापन केली. मात्र, ही सत्ता स्थापन करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये ऐतिहासिक बंड झाले. या बंडाच्या परिणामी महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर इतर राज्यांमध्ये प्रवास केलेल्या बंडखोर आमदारांनी राज्यामध्ये नवे शिंदे फडणवीस सरकार बनवले. या सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले. या एक वर्षात अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. तर काही निर्णयांना वादाची किनार दिसून आली. ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचे सरकार कोसळले, ते पाहता लोकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती. लोकांमध्ये स्वीकार्हता तयार करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने वर्षभरात मोठी मेहनत घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तर अगदी गणशोत्सवात पहाटे पाच वाजेपर्यंत मंडळांना भेट देण्यापासून ते अगदी आषाढी एकादशीमध्ये पंढरपूरात तळ ठोकून बसले असल्याचे पाहायला मिळाले. लोकांमध्ये सहानुभूती मिळवण्यासाठी या सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत.
शिंदे-फडणवीस सरकारच्या नेतृत्वाखाली जवळपास ४० मंत्रिमंडळाच्या बैठका पार पडल्यात. या बैठकांमध्ये ३५० हून अधिक निर्णय घेण्यात आलेले आहेत. बदल्यांसह अंमलबजावणीचे जवळपास १४ हजाराहून अधिक शासन निर्णय जारी करण्याचा विक्रम या सरकारच्या कालावधीत दिसून आला.
परंतू बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचे आरोप झाले, पुण्यासह राज्याच्या अनेक भागांमध्ये कायदा सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्न आणि महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात गेल्याने या सरकारला मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोर जावे लागले. त्यामुळे सरकारच्या या निर्णयांचा लेखाजोखा घेऊन शिंदे फडणवीस सरकारला जनतेच्या कोर्टात सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा मुंबई महानगरपालिकेत हा लेखाजोखा किती स्वीकारते हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शिंदे-फडणवीस सरकारचे वर्षभरातील महत्वाचे निर्णय
शिंदे-फडणवीस सरकारचे वर्षभरातील महत्वाचे निर्णय
⚫एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत तर ज्येष्ठांना मोफत प्रवास
⚫नगराध्यक्ष आणि सरपंचांची निवड थेट जनतेमधून
⚫विदर्भ मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या तिन्ही विकास महामंडळांचं पुनर्गठन
⚫देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात ७५ हजार नोकर भरतीचा निर्णय
⚫ पेट्रोलच्या करात पाच आणि डिझेलच्या दरात तीन रुपयांची कपात
⚫ दिवाळी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामान्यांना 'आनंदाचा शिधा शंभर रुपयात वाटप
⚫ दिवाळी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामान्यांना 'आनंदाचा शिधा शंभर रुपयात वाटप
⚫वर्सोवा वांद्रे सागरी सेतुला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव
⚫ अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या दुप्पट रक्कम तर दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत
⚫राज्यात २१० कोटी रुपये खर्च करून ७०० ठिकाणी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे
⚫ नमो शेतकरी महासन्मान योजनेत राज्यातर्फे प्रत्यक्ष सहा हजार रुपये मदत
⚫ जलयुक्त शिवार अभियान ५००० गावात राबवण्याचा निर्णय
⚫ जलयुक्त शिवार अभियान ५००० गावात राबवण्याचा निर्णय

Editorial
Next Story
Related News
X


