Pratahkal - News Update - Spontaneous blood donation by 141 Nirankari devotees at Ulhasnagar

कल्याण : संत निरंकारी मिशनच्या (Sant Nirankari Mission) माध्यमातून संत निरंकारी सत्संग भवन गोलमैदान, उल्हासनगर येथे एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन (Blood Donation Camp Organized) करण्यात आले होते. ज्यामध्ये १४१ निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करुन मानवसेवेच्या भावनेचा परिचय दिला. 'रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नको' या निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या संदेशाला कृतीत उतरवत आयोजित केलेल्या या शिबिरामध्ये संकल्प रक्तपेढीने आणि रेडक्रॉस सोसायटी रक्तपेढीने एकूण १४१ रक्त युनिट संकलित केले. यामध्ये ८९ पुरुष तर ५२ महिला रक्तदात्यांचा समावेश होता. उल्लेखनीय आहे, की सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निष्काम भावाने मानव सेवा करण्याच्या शिकवणीला अनुसरून निरंकारी भक्त सातत्याने रक्तदानासह विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. संत निरंकारी मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक किशन नेणवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे प्रतिनिधी आणि स्थानिक संत निरंकारी सेवादल स्वयंसेवकांनी महत्वपूर्ण योगदान दिले.
Editorial

Editorial

Next Story