✕
संजीव जैस्वाल यांच्यावर कारवाई केल्याने आयएएस लॉबी अस्वस्थ, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली फडणवीसांची भेट
By EditorialPublished on
कोविड सेंटर (Covid Center) घोटाळ्याप्रकरणी आयएएस अधिकारी संजीव जैस्वाल (IAS officer Sanjeev Jaiswal) यांच्या घरावर ईडीने (ED) छापा टाकल्याने भ्रष्ट आयएएस अधिकाऱ्यांची भीतीने झोप उडाली आहे. यामुळे अस्वस्थ झालेल्या वरिष्ठ आयएएस (Senior IAS) अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली.

मुंबई : कोविड सेंटर (Covid Center) घोटाळ्याप्रकरणी आयएएस अधिकारी संजीव जैस्वाल (IAS officer Sanjeev Jaiswal) यांच्या घरावर ईडीने (ED) छापा टाकल्याने भ्रष्ट आयएएस अधिकाऱ्यांची भीतीने झोप उडाली आहे. यामुळे अस्वस्थ झालेल्या वरिष्ठ आयएएस (Senior IAS) अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली.
जैस्वाल यांच्यावर ईडीने ज्या पद्धतीने कारवाई केली, ती अयोग्य होती. एकदम त्यांच्या घरी धडक मारणेही योग्य नव्हते, अशी या अधिकाऱ्यांची भूमिका आहे.
एखाद्या प्रकरणात आयएएस अधिकाऱ्याचे नाव आल्यानंतर चौकशी करणे याला आमचा विरोध नाही; पण ते आरोपी आहेतच अशा पद्धतीने त्यांच्या घरी काही तास ईडीच्या पथकाने चौकशी करणे, कुटुंबातील सदस्यांना वेठीस धरणे योग्य नाही, अशी भावना या अधिकाऱ्यांनी बोलून दाखवल्याचे समजते. परंतु जर जैस्वाल चुकले असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी; पण त्यावेळी परिस्थिती काय होती आणि त्यातून काय निर्णय घेण्यात आला, याचा विचार व्हायला हवा. एखाद्याला लक्ष्य करून त्याच्यावर कारवाई करणे चुकीचे असल्याचे एका निवृत्त सनदी अधिकाऱ्याने सांगितले. या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपली भूमिका सांगण्याचा प्रयत्न केला. फडणवीसांनी त्यांचे सर्व म्हणणे शांतपणे ऐकूनही घेतले आणि त्यानंतर मात्र फडणवीसांनी जैस्वाल यांच्या कारनाम्यांबाबत खुलासावार माहिती या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याने त्या सर्वांची तोंडं पहाण्यासारखी झाली होती.

Editorial
Next Story
Related News
X


