✕
भाजपचा शाळकरी विद्यार्थ्यांना मदतीचा हात
By EditorialPublished on
दिवसभर घरटीप फिरून पत्र वाटप (Letter Delivery) बरोबर इतर सेवा देणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या (Post Office) पोस्टमन, सोसायटी पाणी सोडणारे असंघटित कर्मचारी यांना पावसाळ्यात छोटीशी मदत म्हणून भाजपचे माजी नगरसेवक विश्वदीप पवार (Vishwadeep Pawar) यांनी मोफत छत्र्या वाटप केल्या. याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि कॉलेज विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेटवर सेवा असा सामाजिक उपक्रम राबविला.

x
डोंबिवली : दिवसभर घरटीप फिरून पत्र वाटप (Letter Delivery) बरोबर इतर सेवा देणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या (Post Office) पोस्टमन, सोसायटी पाणी सोडणारे असंघटित कर्मचारी यांना पावसाळ्यात छोटीशी मदत म्हणून भाजपचे माजी नगरसेवक विश्वदीप पवार (Vishwadeep Pawar) यांनी मोफत छत्र्या वाटप केल्या. याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि कॉलेज विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेटवर सेवा असा सामाजिक उपक्रम राबविला. या कार्यक्रमाला कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण (Cabinet Minister Ravindra Chavan) यांची विशेष उपस्थित होती. पोस्टमन कर्मचाऱ्यांना छत्र्या, शालेय व कॉलेज विद्यार्थ्यांना मोफत वह्या व इंटरनेट सेवा मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे (Kalyan Dombivali Municipal Corporation) भाजपाचे माजी नगरसेवक विश्वदिप पवार (Vishwadeep Pawar) यांनी सामाजिक बांधिलकी आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यक्रम प्रभागातील लोकांसाठी केले आहेत. पावसाळा सुरू होताच प्रतिवर्षाप्रमाणे मोफत छत्र्या वाटप करण्यात आल्या. यामध्ये पोस्टमन, सोसायट्यांचे पाणी सोडणारी माणसे, सोसायटीतील झाडूचे काम करणारी माणसे, धुणीभांडी करणाऱ्या महिला, पावसात रोड वरती उभा राहून हार विकणारे, चहा विकणारे, इस्त्रीचे कपडे घरोघरी जाऊन देणारे, दळण दळून देणारे पिठाच्या चक्कीतील माणसे, रोडवरती बसून पावसात भाजी विकणारे अशा सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या लोकांना छत्री देण्यात आल्या. याबाबत विश्वजित पवार म्हणाले, प्रभागामध्ये गोर-गरीब आणि मध्यंवर्गीय लोक आहेत. येथील मुलांसाठी आपणही थोडीशी मदत करावी म्हणून विद्यार्थ्यांना मोफत १ डझन वह्या दिल्या. कॉलेज विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी इंटरनेट महत्वाचे आहे म्हणून ती सेवाही मोफत कॉ लेज विद्यार्थ्यांसाठी दिली आहे. सदर कार्यक्रम रेणू अपार्टमेंट, सीकेपी हॉल, गडकरी पथ डोंबिवली पूर्व येथील विश्वदीप सुभाष पवार यांच्या कार्यालयात संपन्न झाला. सदर कार्यक्रमासाठी वॉर्ड अध्यक्ष माधुरी भिडे, महीला उपाध्यक्ष धरती गाडा, वंदना गोडबोले, संतोष मेस्त्री, गणेश पाटिल, अश्विनी गायकवाड, शोभा दिवे, अपर्णा सुरंजे, हेमलता संत, सायली सावंत, महेंद्र देशपांडे यांनी विशेष मेहनत घेतली.

Editorial
Next Story
Related News
X
