✕
पवारांनी केले तर मुत्सद्देगिरी आणि शिंदेंनी केले तर गद्दारी कशी?
By EditorialPublished on
वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांच्या मंत्रिमंडळातून (Cabinet) १९७८ मध्ये शरद पवार ४० आमदार घेऊन बाहेर पडले आणि भाजपसोबत (BJP) मुख्यमंत्री झाले. त्यांनी केली तर ती मुत्सद्देगिरी आणि तेच शिंदे (Shinde) यांनी केले तर गद्दारी? हा कुठला न्याय, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांना विचारला आहे.
चंद्रपुर : वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांच्या मंत्रिमंडळातून (Cabinet) १९७८ मध्ये शरद पवार ४० आमदार घेऊन बाहेर पडले आणि भाजपसोबत (BJP) मुख्यमंत्री झाले. त्यांनी केली तर ती मुत्सद्देगिरी आणि तेच शिंदे (Shinde) यांनी केले तर गद्दारी? हा कुठला न्याय, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांना विचारला आहे.
केंद्रात मोदी सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त न्यू इंग्लिश स्कुल मैदान चंद्रपूर (New English School Maidan Chandrapur) येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule), मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आणि इतरही नेते उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले, शिदें गटावर ठाकरे गट कायम बेईमानी अशी टीका करत असते. पण मला आश्चर्च वाटलं की, राष्ट्रवादीनेही गद्दारी म्हणून शिंदे गटाला डिवचलं. वो करे तो रासलीला, मै करू तो कॅरेक्टर ढिला, तशी अवस्था आहे. १९७८ मध्ये वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातून शरद पवार ४० आमदार घेऊन बाहेर पडले आणि भाजपसोबत मुख्यमंत्री झाले. हे सरकार दोन वर्ष चाललं इंदिराजींनी ते सरकार बरखास्त केलं नसतं, तर पाच वर्ष चाललं असतं. तेव्हा त्यांनी केली तर ती मुत्सद्देगिरी आणि तेच शिंदे यांनी केले तर गद्दारी? हा कुठला न्याय, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अडीच वर्ष तुम्ही १०० कोटींची वसुली करणारे, फेसबुकवर असलेले, घरी बसलेले सरकार पाहिले, आता खऱ्या अर्थाने जनतेचे सरकार आले आहे, असे सांगून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.
पुढे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) अमेरिका (America) दौऱ्यावर गेले, त्या अमेरिकेतील त्यांचे भव्य स्वागत संपूर्ण जगाने पाहिले आणि दुसरीकडे राहुल गांधी अमेरिकेत जाऊन भारत कसा वाईट, यावर व्याख्याने देतात. त्यांनी भारतात लोकशाही नाही, असे सांगितले आणि त्यावर अमेरिकेनेच खुलासा करून सांगितले की, भारतात लोकशाही आहे आणि ती समृद्ध सुद्धा होते आहे. खरे तर काँग्रेसला लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही, आजचाच दिवस आहे, ज्यादिवशी इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लोकशाहीची हत्या केली होती, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Editorial
Next Story
Related News
X


