Pratahkal - News Update - Yachi Dehi Yachi Dola, Pahwa such a ringing Sohla!
वेळापूर : विठुरायाच्या (Vitthal) पंढरीत सध्या वैष्णवांचा मेळा आता जमला असून अवघा आनंदाचा सोहळा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. खुडूस फाटा येथे संत ज्ञानेश्वरांच्या (Saint Dnyaneshwar) पालखीचे दुसरे गोल रिंगण पार पडले. तर माळीनगरमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उभे रिंगण संपन्न झाले. ऊन, वारा, पाऊस या कशाचीही तमा न बाळगता वारकरी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावामध्ये पंढपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. या वारी सोहळ्यातील सर्वात आनंदाचा आणि डोळ्यात साठवून ठेवावा असा सोहळा म्हणजे रिंगण सोहळा. आळंदीमधून प्रस्थान केलेल्या संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचा दुसरा रिंगण सोहळा आज खुडूस फाटा येथे पार पडला. तर देहूमधून मार्गक्रमण करत असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा उभ्या रिंगणाचा सोहळा देखील आज पार पडला. संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे खुडूस येथे पार पडलेल्या रिंगण सोहळ्यात मानाच्या अश्वांनी दोन प्रदक्षिणा ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना घातल्या. हा रिंगण सोहळा पार पडताच मानाच्या अश्वांच्या टापा खालची माती उचलण्यासाठी वारकऱ्यांनी केलेली एकच गर्दी यावेळी पाहायला मिळाली. रिंगण सोहळा पार पडल्यानंतर पालखीने प्रस्थान करत पालखीचा मुक्काम वेळापूर येथे आहे. तर संत तुकाराम महारांजी पालखी अकलुज वरुन निघाल्यानंतर माळीनगर येथे सकाळी पालखीचे पहिले उभे रिंगण पार पडले. उभे रिंगण पार पडल्यानंतर पालखीने बोरगावच्या दिशेने प्रस्थान केले. संत तुकाराम महाराजांची पालखी आज बोरगाव येथे मुक्कामाला आहे.
Editorial

Editorial

Next Story