Pratahkal - News Update - Aapkhtonech Pawasat Mumbaichi Tumbai!
पहिल्याच पावसात मुंबईची (Mumbai) तुंबई झाली. अनेक ठिकाणी पाणी साचले. पहिल्याच पावसात मुंबईतील नालेसफाईचा फज्जा देखिल उडाल्याचे चित्र असून अंधेरीसह इतर भागात कमरेपर्यंत पाणी साचल्याचे दिसून आले. यावरुन आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी या संबंधित महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
देर आये दुरुस्त आये, या म्हणीप्रमाणे ओढ घेतलेल्या पावसाने शनिवारी मुंबईत जोरदार एन्ट्री केली आणि पहिल्याच पावसाने मुंबईची दाणादाण उडवली. मुंबईत ठिकठिकाणी पाणी साठलं होतं. पाण्याचा निचरा होत नसल्यानं मुंबईकरांना पाण्यातून वाट काढावी लागत होती. तर अनेक ठिकाणी गाड्या अडकल्या होत्या.
मुंबईतल्या पहिल्याच पावसाने नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल केलीय. अंधेरी भागात झालेल्या पावसाने पाणीच पाणी अशी स्थिती रस्त्यावर झाली होती. पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की, लोकांना आधार देऊन सुरक्षित ठिकाणी घेऊन जावं लागत होतं. मुंबईतील नालेसफाईवरीन आदित्य ठाकरेल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, मुंबईमध्ये काल अनेक ठिकाणी पाणी भरले. मुख्यमंत्री स्वतः नाल्यात उतरले, पण नालेसफाई झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबईकरांच्या प्रश्नाबाबत मुंबई मनपाने काळजी घ्यायला हवी होती. एका ठिकाणी इमारत कोसळली, लोकांच्या जीविताशी खेळ सुरू असून याची चौकशी झाली पाहिजे. गोवंडीत मॅनहोलमध्ये उतरलेले दोन कामगार गुदमरून मेले, त्याला महापालिका प्रशासन जबाबदार आहे. या ठिकाणी तंत्रज्ञानाचा उपयोग करायला पाहिजे. अशा दुर्घटना होऊ नयेत म्हणून काम करायला पाहिजे, अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. नगरसेवक नाहीत म्हणून मॉनिटरिंग करण्यास कोणी नाही. त्यामुळे प्रशासक आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

Editorial

Editorial

Next Story