Pratahkal - Marathi News Update - Investigate the PM care fund scam only
मुंबई : ज्या सरकारचा जन्मच मुळात खोक्यांतून ते काय चौकशी करणार, असा तिखट सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधताना उपस्थित केला आहे. आम्ही चौकशीला घाबरत नाही. चौकशी करायची तर ठाणे मनपाची चौकशी करा. भाजपचे (BJP) आमदार संजय केळकर (Sanjay Kelkar) यांनीच ही मागणी केली आहे. पण या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचीच काही किंमत नाही, तर केळकरांची काय असणार, असा खोचक टोलाही ठाकरेंनी यावेळी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, पीएम केअर फंडची चौकशी करायला हवी. जशी आमची चौकशी करता आहात तशी तुमची चौकशी करायला हवी. मिळेल तिथे खा अशी आमची परंपरा नाही, आम्ही चौकशीला घाबरत नाही. पिंपरी चिंचवड, पुणे, नागपूर मनपाची चौकशी करायला हवी. कोरोना
(Corona)
काळात राज्याने १५ दिवसांमध्ये रुग्णालये चालू केली, तर केंद्र सरकारने नुसत्या थाळ्या आणि टाळ्या वाजवायला लावले.
कोरोना काळात एकाही मृतदेहाची आम्ही विटंबना होऊ दिली नाही. उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही कुणाच्या परिवारावर बोलत नाही, फडणवीसांनी आमच्या परिवारावर बोलू नये. हो तुम्ही म्हणताय ना की कुटुंबाला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मी म्हणतो हो सुरू आहे, ही शिवसेना माझे कुटुंब आहे. आणि वारस्याच्या टीकेवर बोलताना माझ्या वडीलांचे आजोबा देखील प्लेगच्या साथीच्या वेळेस काम करत होते. मी नायक आहे की खलनायक आहे हे जनता ठरवेल.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, मेहबुबा मुफ्ती माझ्या बाजूला बसल्या असे तुम्ही म्हणता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा तुमच्या बाजूला बसले आहेत. मोठी लोक ज्या मार्गाने गेली त्या मार्गाने आपण जायला हवे म्हणून आम्ही गेलो. मी चुकीचा असेल तर भाजपचे नेते चुकले हे सर्वांनी मान्य करावे, माझ्याविरोधात संपूर्ण भाजप उभी राहिली आहे. ओडिसामध्येही माझ्याविरोधात भाषण केली जात आहे. मेहबुबा मुफ्ती यांना ३७० हटवणार नाही, असे आश्वासन भाजपने दिले होते. तिथे अजूनपर्यंत निवडणूक का झाली नाही, असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवर हतोडा चालवला.
यापुढे हातोडा चालविण्यास हात साबूत ठेवणार नाही, असा इशारा ठाकरेंनी दिला आहे. विखे पाटील यांनी झाकीर नाईक याच्याकडून पैसे घेतले, हिंमत असेल तर विखे यांच्यावर धाड टाका.

Editorial

Editorial

Next Story