✕
परिवार वाचवण्यासाठी पाटण्यात विरोधकांची बैठक, याचा परिणाम होणार नाही देवेंद्र फडणवीसांची टीका
By EditorialPublished on
पाटण्यात आज होत असलेली विरोधी पक्षांची बैठक ही परिवार वाचवण्यासाठी असल्याची टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पाठीशी आहे. त्यामुळं या बैठकीचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे फडणवीस म्हणाले. आपला परिवार कसा वाचू शकेल आणि आपल्याच कुटंबाकडे सत्ता कशी राहू शकेल यासाठी हे विरोधक एकत्र आल्याचे फडणवीस म्हणाले. मेहबुबा मुफ्तीच्या नावावर भाजपला टोमणे मारणारे उद्धव ठाकरे आज मेहबुबा मुफ्ती

x

मुंबई, दि. २३ (प्रतिनिधी ) : पाटण्यात आज होत असलेली विरोधी पक्षांची बैठक ही परिवार वाचवण्यासाठी असल्याची टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पाठीशी आहे. त्यामुळं या बैठकीचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे फडणवीस म्हणाले. आपला परिवार कसा वाचू शकेल आणि आपल्याच कुटंबाकडे सत्ता कशी राहू शकेल यासाठी हे विरोधक एकत्र आल्याचे फडणवीस म्हणाले. मेहबुबा मुफ्तीच्या नावावर भाजपला टोमणे मारणारे उद्धव ठाकरे आज मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत जात असल्याचेही फडणवीस म्हणाले. विरोधकांसाठी राज्य चालवणं हा धंदा आहे. तर भाजप आणि मोदीजी यांच्यासाठी ती सेवा असल्याचे फडणवीस म्हणाले. मागच्या काळात २०१९ ला हे सगळे लोक एकत्र आले होते. पण जनता मोदीजींच्या पाठीशी राहिल्याचे फडणवीस म्हणाले. २०२४ मध्ये मागच्या वेळीपेक्षा जास्त ताकदीने जनता मोदीजींच्या पाठीशी उभी राहील असे फडणवीस म्हणाले. त्यामुळं या बैठकीचा कोणताही
परिणाम होणार नसल्याचे फडणवीस म्हणाले.
सातत्यानं मेहबुबा मुफ्तीच्या (Mehbooba Mufti) नावावर भाजपला (BJP) टोमणे मारणारे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत जात आहेत. पण त्यांच्या बाजूलाच बसले आहेत. त्यामुळं सत्तेकरता आणि परिवार वाचवण्याकरता सगळ्या प्रकारचे तडजोड करण्यासाठी ते तयार असल्याचे फडणवीस म्हणाले.

Editorial
Next Story
Related News
X
