✕
तुकोबांच्या पालखीला अश्वांचं रिंगण तर ज्ञानोबांच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण
By EditorialPublished on
संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांचा पालखी सोहळा सणसरचा मुक्काम आटपून गुरुवारी सकाळी साडेसात वाजता बेलवाडीमध्ये रिंगण सोहळ्यासाठी दाखल झाला. इंदापूर तालुक्यातील वेलवाडी येथे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले अश्वरिंगण पार पडले. पालखीला अगोदर प्रथम झेंडेकरी नंतर तुळशी वृंदावन घेत महिला वारकरी, त्यानंतर विणेकरी यानंतर मानाच्या पालखी बरोबर असणाऱ्या अश्वाने रिंगणाच्या तीन फेच्या केल्या. मात्र यावर्षी रिंगण सोहळा सुरू झाल्याने रिंगणात उत्साह दिसून आला. संत तुकाराम महाराजांचा आजचा मुक्का

x

इंदापूर, दि. २० (वार्ताहर) : संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांचा पालखी सोहळा सणसरचा मुक्काम आटपून गुरुवारी सकाळी साडेसात वाजता बेलवाडीमध्ये रिंगण सोहळ्यासाठी दाखल झाला. इंदापूर तालुक्यातील वेलवाडी येथे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले अश्वरिंगण पार पडले. पालखीला अगोदर प्रथम झेंडेकरी नंतर तुळशी वृंदावन घेत महिला वारकरी, त्यानंतर विणेकरी यानंतर मानाच्या पालखी बरोबर असणाऱ्या अश्वाने रिंगणाच्या तीन फेच्या केल्या. मात्र यावर्षी रिंगण सोहळा सुरू झाल्याने रिंगणात उत्साह दिसून आला. संत तुकाराम महाराजांचा आजचा मुक्काम अंथुर्णे येथे असणार आहे.
पूर्ण देहभान हरपून विठुनामाचा जप करीत तुकाराम महाराजांचा जयघोष करीत वारकऱ्यांनी पहिले गोल रिंगण केले. हा नेत्रदीपक रिंगण सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लाखो भाविकांनी गर्दी केली होती.
वारीच्या वाटेवर रिंगण सोहळा हा वारकऱ्यांना आनंद देणारा उत्साहीत करणारा सोहळा असतो. यामुळे वारकऱ्यांना बेलवाडीतील रिंगण सोहळ्याची उत्सुकता असते. संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील अश्व रिंगणाला पार महत्व आहे. त्यामुळे दरवर्षी पालखीला अश्वरिंगण घातलं जातं. या सोहळ्यासाठी अनेक वारकरी आतुर असतात.
संत ज्ञानोबांची पालखी (Palkhi of Sant Dnyanoba) आज लोणंदहून मार्गस्थ होऊन रात्री तरडगावला मुक्कामी आहे.
चांदोबाचा लिंग येते आज ज्ञानोबांच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण झाले. हरिनामाच्या जयघोषात आणि टाळ-मृदुंगांच्या गजरात काल माउलीं काल माउलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान करण्यात आले. आज उभं रिंगण असल्याने हजारो वारकऱ्यांची गर्दी जमली होती. टाळ मृदंगाचा गजरात वारकरी भाविकांची शिस्तबध्द उभी रांग, माउलींच्या अश्वांची दौड आणि दिंडीतील वारकऱ्यांनी धरलेला ठेका, सोबतच टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या गजरानं आसमंत दुमदुमून जात आहे. ज्ञानोबांच्या पालखीचा आजचा मुक्काम तरडगावमध्ये आहे.
- आजपासून भाविकांसाठी २४ तास दर्शन व्यवस्था सुरु
आषाढ महिना सुरू झाला असून वारकऱ्यांना आता एकादशीचे वेध लागले आहेत. एकादशीच्या निमित्ताने आता विविध पारंपरीक पूजा विधी सुरू झाल्या आहेत. आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या जास्तीतजास्त भाविकांना विठुरायाच्या पदस्पर्श आणि मुख दर्शनाचा लाभ देण्यासाठी आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद करून २४ तास दर्शन व्यवस्था सुरु करण्यात आली आहे.
सकाळी अकरा वाजता विठ्ठल रुक्मिणीचा पलंग काढण्यात आला असून आषाढी यात्रा संपेपर्यंत देव झोपायला जाणार नाहीत. देवाचा पलंग निघतो म्हणजेच देवाची रात्रीची विश्रांती बंद होत असते. आषाढी आणि कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूर मध्ये येत असतात. यातील जास्तीतजास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्याची परंपरा आहे. त्यानुसार देवाचा आणि रुक्मिणी मातेच्या शेजघरातील पलंग काढून ठेवण्यात येतो. यामुळे देवाची झोप बंद होते, अशी प्रथा आहे.
आज मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पूजेनंतर विठुरायाच्या पाठीला लोड तर रुक्मिणी मातेच्या पाठीला मऊ कापसाचा तक्क्या लावण्यात आला आहे. चोवीस तास दर्शनाला उभारून देवाला शिणवटा जाणवू नये यासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या पाठीला मऊ कापसाचा लोड आणि तक्क्या लावण्याची परंपरा आहे. इतर वेळा विठुरायाच्या राजोपचाराला पहाटे चार वाजल्यापासून सुरुवात होत असते. ती रात्री शेजारती पर्यंत म्हणजे रात्री साडेअकरा वाजेपर्यंत चालते आणि त्यानंतर मंदिर बंद होत असते. आता देवाचा पलंग निघाल्यामुळे दिवसभरात सकाळी देवाचे स्नान नित्यपूजा, दुपारी महानैवेद्य आणि संध्याकाळी लिंबूपाणी एवढ्याच साठी दर्शन बंद राहणार आहेत.
उरलेल्या सर्व वेळात दिवसरात्र देव अखंड दर्शनासाठी उभा असणार आहे. आता आषाढी यात्राकाळात आजपासून मंदिर २४ तास दर्शनासाठी उघडे राहणार आहे. यामुळे यात्राकाळात तासाला अडीच ते तीन हजार भाविकांचे दर्शन होत असल्याने दिवसभरात लाखभर भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ मिळू शकणार आहे.

Editorial
Next Story
Related News
X
