Pratahkal - Marathi News Update - Genelia shared an emotional post On Raheel's birthday , 'Baby, you promise me
जिनिलीया (Genelia) आणि रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) या दोघांकडे बॉलीवूडमधील (Bollywood) आदर्श जोडी म्हणून पाहिले जाते. २०१२ मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर विविध व्हिडिओ शेअर करून ते आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करीत असतात. या जोडप्याला रियान (Ryan) आणि राहिल (Rahil) अशी दोन मुलं असून, यापैकी राहिलच्या वाढदिवसानिमित्त (On Raheel's birthday) जिनिलीयाने इन्स्टाग्रामवर (Instagram) भावुक पोस्ट (Post) करीत आपल्या लाडक्या लेकाला शुभेच्छा दिल्या आहेत. जिनिलीया लिहिते, 'माझ्या प्रिय बाळाष्ठ जशी वर्ष संपत आहेत तसा तू माझ्यापासून आणखी दुरावणार आहेस कारण, आता चालताना तुला माझा हात धरण्याची गरज नाहीष्ठ आता तुझ्यामध्ये स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची क्षमता निर्माण झाली आहे. पाणी ग्लासमध्ये ओतून देण्यासाठी यापुढे तुला मदतीची गरज लागणार नाही, कारण तू अगदी व्यवस्थित तुझी कामे करतोस. पूर्वीप्रमाणे आता सतत तुला आई-बाबांची गरज भासणार नाही कारण, तुझे मित्र, प्रशिक्षक आणि शिक्षक तुला पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करीत आहेत.'
जिनिलीया पुढे लिहिते, 'तुला मोठं होताना पाहून मी आणि तुझे बाबा आम्ही दोघे एका कोपऱ्यात उभे राहून कायम तुझे कौतुक करूष्ठमी खरंच तुझ्या लहानपणीची प्रत्येक गोष्ट मिस करेन. मी आणि तुझ्या बाबांनी स्वतःला एक वचन दिले होते की, तू जीवनात जो मार्ग निवडशील त्याचा आम्ही एक भाग होऊ. इथून पुढे तुला तुझे आयुष्य तुला जगायचे आहेष्ठतू हसताना, रडताना, तुझ्या मदतीसाठी आम्ही तुझ्याबरोबर कायम आहोत. मी हे सर्व काही लक्षात ठेवेन पण, तू मला एकच वचन देष्ठबाळा तू मला रोज अशीच मिठी मारशील, तुझ्याकडून ही एकच गोष्ट मला कायम हवी आहे.'
'मेस्सी आणि फुटबॉलवर तुझे जेवढे प्रेम आहे, त्यापेक्षा खूप जास्त माझा तुझ्यावर जीव आहे. प्रिय राहिल, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.' आपल्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना जिनिलीयाने ही भावुक पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्रीने केलेली पोस्ट पाहून रितेश- जिनिलीयाच्या चाहत्यांनी सुद्धा राहिलला पुढच्या वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
Editorial

Editorial

Next Story