✕
मनिषा कायंदे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
By EditorialPublished on
शिवसेना ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी अखेर आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत त्यांनी ठाण्यातील आनंदाश्रम येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर त्यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला. मागील एक वर्ष प्रतीक्षा केली. मात्र, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काय केलं, असा सवाल त्यांनी केला. आज शिबिरात असलेले अनेकजण शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावाही कायंदे यांनी केला. मुख्यमंत्री एकन

x

मुंबई, दि. १८ (प्रतिनिधी) : शिवसेना ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी अखेर आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत त्यांनी ठाण्यातील आनंदाश्रम येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर त्यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला. मागील एक वर्ष प्रतीक्षा केली. मात्र, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काय केलं, असा सवाल त्यांनी केला. आज शिबिरात असलेले अनेकजण शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावाही कायंदे यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनिषा कायंदे यांची सचिवपदी नियुक्ती केली.
शिवसेना ठाकरे गटाचे आज वरळीत शिवीर पार पडले. मात्र, त्यापूर्वीच शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे ह्या नॉट रिचेबल झाल्या होत्या. त्या शिंदे गटात प्रवेश करतील अशी अटकळ बांधली जात होती. अखेर त्यांनी शिवसेना शिंदे गटात आज प्रवेश केला. आगामी महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. राज्यात अनेक प्रमुख महापालिकांची मुदत संपली आहे. येणाऱ्या काळात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातून शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मनिषा कायंदे यांनी म्हटले की, माझ्यासाठी आज खूप सन्मानाचा दिवस आहे. जी मूळ शिवसेना आहे यांच्यामध्ये आज मी पक्ष प्रवेश करत असल्याचे त्यांनी म्हटले. मी पक्षाची भूमिका भक्कमपणे मांडली. हा बदल का झाला आत्ताच का झाला? हा सरकार एक वर्ष पूर्ण करत आहे. एका वर्षामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामातून त्यांना उत्तर दिलं असल्याची कायंदे यांनी म्हटले. बाळासाहेबांचे शिवसेना इथे आहे म्हणून मी इथे आहे. कोणी तरी सांगितलं कचरा निघून जात आहे. कचरातून ऊर्जा निर्मिती होते असं म्हणत कायंदे यांनी आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) टोला लगावला.

Editorial
Next Story
Related News
X
