Pratahkal - Marathi News Update - Action will be taken if Aadhaar card is not available, treatment is denied
मुंबई : आधार कार्ड (Aadhar Card) नसणाऱ्यांना उपचार नाकारल्यास कारवाई केली जाणार आहे. मुंबई (Mumbai) महापालिकेने आरोग्य अधिकाऱ्यांना तसा इशारा दिला आहे. नुकताच राजावाडी रुग्णालयात एका गर्भवतीकडे नवऱ्याचे आधारकार्ड नसल्याने उपचार नाकरल्याची घटना घडली. या घटनेनंतर अनेक सामाजीक आणि रुग्णमित्र संस्थांनी याबाबत तक्रार करत विरोध केला. मुंबई महानगरपालिकेने आरोग्य विभागाला आधारकार्ड नसल्यास कोणत्याही गर्भवतीला आरोग्य सुविधा न देता परत पाठवू नका, असे आदेश दिले आहेत.
राजावाडी रुग्णालय (Rajawadi Hospital) प्रकरणात प्रामुख्याने आरोग्य जनहक्क समिती धावून आली आहे. नाल्याची सफाई करत असताना गर्भवती महिला खड्ड्यात पडली. त्यानंतर जखमी महिला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी आली होती. त्यावेळी तिच्याकडे आधारकार्ड नसल्याने तिला घरी पाठविण्यात आले. एवढच नाही तर महिला अगोदर शताब्दी रुग्णालयात गेली होती. तेथेही तिला उपचार नाकारला होता.
या घटनेची दखल आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी घेतली. आधारकार्ड नसलेल्या कोणत्याही गर्भवती महिलेला आरोग्य सुविधा देण्याचे आदेश दिले आहेत. आदेशाचे पालन न झाल्यास कारवाई करण्यात येईल, असे गोमारे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल जनतेला मोफत आरोग्य उपचार मिळावेत यासाठी केंद्र सरकारकडून 'आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना' राबवण्यात येत आहे. देशातील कोट्यवधी लोक या योजनेत सहभागी झाले आहेत. या योजनेअंतर्गत सरकारकडून जनतेला पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत दिले जातात. कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींनी अर्ज करू शकते. 'आयुष्मान भारत योजना' (Ayushman Bharat Scheme) ही भारत सरकारची आरोग्य योजना आहे. या योजनेतंर्गत सरकार लोकांना 'आयुष्मान भारत गोल्डन कार्ड ' प्रदान करते. या योजनेंतर्गत आयुष्मान भारत गोल्डन कार्डद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक रुग्णालयात जाऊन ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळवू शकतात. आयुष्मान भारत योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय १८ वर्ष किंवा त्याहून अधिक असावं. यासाठी तुम्हाला mera.pmjay.gov.in वेबसाईटवर जावं लागेल.
Editorial

Editorial

Next Story