✕
समान नागरी कायदा तात्काळ लागू व्हावा ! - चंद्रशेखर बावनकुळे
By EditorialPublished on
समान नागरी कायदा (Uniform Civil Law) अतितातडीने लागू झाला पाहिजे. भाजपाचीही हीच भूमिका असून, प्रत्येक धर्म व समाजाचा नागरिकाला सारखा अधिकार असावा, महाराष्ट्राच्या (Maharashtra) मनातील इच्छा आहे, असे स्पष्ट करून भाजपाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले,

x

मुंबई, दि. १५ (प्रतिनिधी) : समान नागरी कायदा (Uniform Civil Law) अतितातडीने लागू झाला पाहिजे. भाजपाचीही हीच भूमिका असून, प्रत्येक धर्म व समाजाचा नागरिकाला सारखा अधिकार असावा, महाराष्ट्राच्या (Maharashtra) मनातील इच्छा आहे, असे स्पष्ट करून भाजपाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, की भाजपच्या जाहीरनाम्यात समान नागरी कायदा आणण्याचे आश्वासन आम्ही दिले आहे. जी आश्वासने दिली त्यांची पूर्तता होईल.' २२व्या विधि आयोगाने समान नागरी कायद्यासंदर्भात नागरिकांच्या हरकती व सूचना मागविल्या आहेत. त्यामध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करून ते म्हणाले, की संविधानाने प्रत्येक राज्याला समान नागरी कायदा लागू करण्याचे अधिकार दिले आहेत. आता सुरू झालेली प्रक्रिया देशाच्या हितासाठी गरजेची आहे. ३७० कलम हटविणे, अयोध्येमध्ये (Ayodhya) राम मंदिर (Ram Mandir) उभारणे आणि समान नागरी कायद्याचे आश्वासन दिले होते. त्यापैकी जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटविले आहे. राम मंदिराचे बांधकाम वेगात सुरू आहे.

Editorial
Next Story
Related News
X
