✕
संजय राऊत धमकीप्रकरणी मयुर शिंदेला अटक
By EditorialPublished on
: शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मयुर शिंदेला अटक करण्यात आली आहे. राऊतांची सुरक्षा वाढवावी यासाठी बनाव रचल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिस सूत्रांनी ही माहिती दिली. मयुर शिंदे हा सुनील राऊतांचा निकटवर्तीय आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

x

मुंबई, दि. १५ (प्रतिनिधी) : शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मयुर शिंदेला अटक करण्यात आली आहे. राऊतांची सुरक्षा वाढवावी यासाठी बनाव रचल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिस सूत्रांनी ही माहिती दिली. मयुर शिंदे हा सुनील राऊतांचा निकटवर्तीय आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करत संजय राऊत यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला शोधून काढले. या व्यक्तीचे नाव मयूर शिंदे असे आहे. मयुर शिंदेने संजय राऊतांची सुरक्षा वाढवण्यासाठी हा बनाव रचला होता. मयुर शिंदेने स्वतः फोन केले नाहीत. मात्र मयुर शिंदे हा या मागचा मुख्य सूत्रधार असून आपल्या जवळच्या साथीदारांना त्याने हे फोन करण्यास सांगितल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
प्राथमिक माहितीनुसार, कांजूरमार्ग पोलिसांनी मयूर शिंदेला अटक केली आहे. मयूर शिंदे याच्यावर मुंबई उपनगरात अनेक गुन्हे दाखल आहेत. मयूर शिंदे याची पार्श्वभूमी जरी गुन्हेगारी क्षेत्रातील असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला होता. खासदार संजय राऊत आणि सुनील राऊत यांच्या सोबत त्याचे कौटुंबिक संबंध असल्याची माहिती देखील समोर येत आहे. आमदार सुनील राऊत यांच्या २०१४ च्या निवडणूक प्रचारासाठी मयूर शिंदे यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली होती. त्यामुळे आता याप्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. राऊत कुटुंबीयांच्या इतक्या जवळ असणाऱ्या व्यक्तीनेच संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी का दिली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामागे नेमका काय हेतू असावा, याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. या ट्विस्टमुळे पोलिसांसमोरील आव्हान वाढले आहे. तसेच मयूर शिंदे यांनी संजय राऊत यांना धमकी का दिली, याबद्दल संभ्रम आणखीनच वाढला आहे. पोलिस कारवाईवेळी रिझवान झुल्फिकार अन्सारी आणि शाहिद अन्सारी या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता मयूर शिंदे यांचे नाव समोर आले आहे. त्यांच्या चौकशीतून पोलिसांच्या हाती आणखी कोणती माहिती हाती लागणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Editorial
Next Story
Related News
X
