Pratahkal-Why did Daya Ben leave the series?

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी, प्रोडक्शन हेड सोहेल रमानी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादात सापडले आहेत. मालिका सोडलेल्या काही कलाकारांनी त्यांच्यावर गैरवर्तनाचे गंभीर आरोप केले आहेत. मिसेस रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारी जेनिफर मिस्त्री सातत्याने मालिकेच्या निर्मात्यांवर आरोप करीत आहे. त्यानंतर आता मालिकेत बावरीची भूमिका साकारणाऱ्या मोनिका भदोरियाने सुद्धा निर्मात्यांवर टीका केली आहे.
मोनिका भदोरियाने 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या सेटवर काम करताना आलेल्या अडचणींचा खुलासा 'बॉलीवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. या वेळी मोनिकाला दया बेन म्हणजेच दिशा वाकानी
(Disha Vakani)
शोमध्ये पुन्हा का येत नाही यामागचे नेमके कारण काय, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर मोनिका म्हणाली, 'मी त्या गोष्टीविषयी काहीच बोलणार नाही. कदाचित तिलाही असाच काहीसा अनुभव आला असावा कारण, तुम्हाला चांगले मानधन देऊनही तुमची कार्यक्रमात पुन्हा येण्याची इच्छा नसेल तर, यामागे दुसरे काय कारण असू शकते?"
मोनिका पुढे म्हणाली, याउलट मला माझ्या मेहनतीचा पैसा मिळवण्यासाठी वर्षभर स्ट्रगल करावा लागला. जेव्हा मी त्यांना म्हणाले मी CINTAA कडे तुमची तक्रार करेन तेव्हा मला माझे मानधन देण्यात आले. सगळ्यांना त्यांनी हीच वागणूक दिली होती. 'तारक मेहताष्ठ' च्या संपूर्ण प्रवासात मला ठरवून दिलेले मानधन केव्हाच दिले गेले नाही. ' दरम्यान, मोनिका भदोरियाच्या आधी 'तारक मेहताष्ठ' मधील अनेक कलाकारांनी मालिकेचे निर्माते असित मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. जेनिफर मिस्त्रीने असित मोदींसह, सोहेल रमानी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.
Editorial

Editorial

Next Story