✕
युतीत खडा पडेल असं कुणीही काहीही बोलू नका : फडणवीस
By EditorialPublished on
आज शिवसेनेकडून प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर 'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशा आशयाची जाहिरातबाजी करण्यात आली. यामुळे शिवसेना-भाजपा युतीत काहीतरी बिनसल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र आज राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यासंबंधी शिवसैनिकांसोबत स्पष्ट चर्चा केली. 'युतीत या गोष्टी होत राहतात, त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही', असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबई, दि. १३ (प्रतिनिधी) : आज शिवसेनेकडून प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर 'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशा आशयाची जाहिरातबाजी करण्यात आली. यामुळे शिवसेना-भाजपा युतीत काहीतरी बिनसल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र आज राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यासंबंधी शिवसैनिकांसोबत स्पष्ट चर्चा केली. 'युतीत या गोष्टी होत राहतात, त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही', असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ‘आपण युतीमध्ये आहोत, त्यामुळे या गोष्टी होतच राहतात. काळजी करु नका, एकत्र काम करत राहूयात', असा सल्ला फडणवीसांनी शिवसैनिकांना दिला. तसेच युतीत खडा पडेल असं कुणीही काहीही बोलू नये, असा कानमंत्र त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिला आहे.
देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गेल्या ११ महिन्यांत सांघिकपणे महाराष्ट्रात (Maharashtra) जे काम केलं त्याची महाराष्ट्राने नोंद घेतली आहे. सर्वेक्षण झालं याचा अर्थ आमची जबाबदारी वाढली आहे, विजय टिकवणं ही आमची जबाबदारी आहे, असं मत उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी व्यक्त केलं. आज कोल्हापूर (Kolhapur) येथे होणाऱ्या 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार होते. मात्र त्यांना कानाचा त्रास सुरु झाल्याने त्यांनी दौरा रद्द केला आहे. सायनसचा त्रास बळावल्याने देवेंद्र फडणवीस यांना दोन दिवस विमान प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे फडणवीस आज कोल्हापूरला जाणार नाहीत, अशी माहिती दीपक केसरकर (Deepak Kesarkar) माध्यमांशी बोलताना दिली.

Editorial
Next Story
Related News
X



