✕
विठुनामाच्या गजरात ज्ञानोबा, तुकोबांच्या पालख्या पुण्यात दाखल
By EditorialPublished on
विठूरायाच्या भेटीसाठी पंढरीच्या दिशेनं निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज (Saint Dnyaneshwar Maharaj) आणि संत तुकाराम महाराजांच्या (Sant Tukaram Maharaj) पालख्यांचं पुण्यात (Pune) मुक्कामासाठी आगमन झालं आहे. पुण्यातल्या संगमवाडी पुलाजवळ दोन्ही पालख्या एकमेकांना भेटल्या आहेत. या दोन्ही पालखीत वारकऱ्यांची आलोट गर्दी झाली आहे. लाखो वारकरी पुण्यात दाखल झाल्यानं पुण्यात चैतन्याचं वातावरण निर्माण झालं.

पुणे, दि. १२ (वार्ताहर) : विठूरायाच्या भेटीसाठी पंढरीच्या दिशेनं निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज (Saint Dnyaneshwar Maharaj) आणि संत तुकाराम महाराजांच्या (Sant Tukaram Maharaj) पालख्यांचं पुण्यात (Pune) मुक्कामासाठी आगमन झालं आहे. पुण्यातल्या संगमवाडी पुलाजवळ दोन्ही पालख्या एकमेकांना भेटल्या आहेत. या दोन्ही पालखीत वारकऱ्यांची आलोट गर्दी झाली आहे. लाखो वारकरी पुण्यात दाखल झाल्यानं पुण्यात चैतन्याचं वातावरण निर्माण झालं.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं पंढरपूरच्या (Pandharpur) वारीसाठी शनिवारी देहूमधून प्रस्थान ठेवलं होतं. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोमवारी आळंदीहून (Alandi) पुण्याच्या दिशेनं निघाली. या दोन्ही पालख्यांच्या स्वागतासाठी पुणेकरांनी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी केली होती. पुणे महापालिकेच्या वतीनं पाटील इस्टेट परिसरात दोन्ही पालख्यांचं स्वागत करण्यात आलं.
दोन्ही पालख्या संगमवाडी पुलाजवळ भेटीसाठी एकमेकांना सामोऱ्या आल्या, त्यावेळी विलोभनीय दृश्य तयार झालं. पंढरपूरच्या वारीदरम्यान माउली आणि तुकोबारायांच्या पालख्यांची होणारी ही पहिली भेट असते. त्यानंतर या दोन्ही पालख्या वाखरीत एकत्र येतात. ज्ञानोबा माउली आणि तुकोबारायांच्या पालख्या आता दोन दिवस पुण्यात मुक्कामाला आहेत. माउलींची पालखी विठोबा मंदिरात, तर तुकोबारायांची पालखी निवडुंगा विठ्ठल मंदिरात विसावणार आहे.
Next Story
Related News
X



