Pratahkal - Marathi News Update - Mitavi wakes up in Srinagar to raise 'Maharashtra Bhavan'
जम्मू : श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन (Maharashtra Bhawan in Srinagar) बांधण्याचा महाराष्ट्र राज्य सरकारचा (Maharashtra State Government) प्रस्ताव आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत, या दरम्यान त्यांनी श्रीनगरमध्ये जम्मू-कश्मीर (Jammu and Kashmir) उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली आणि त्यावेळी महाराष्ट्र भवनासाठी श्रीनगरमध्ये जागा मिळावी, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (११ जून ) श्रीनगरमध्ये उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी मुख्यमंत्र एकनाथ शिंदेंनी त्याबद्दलचं पत्र देखील दिलं आहे. पत्रात मुख्यमंत्री म्हणतात की, पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन सांस्कृतिक देवाण- घेवाण वाढवणे आणि पर्यायाने आर्थिक विकास करणे, यासाठी महाराष्ट्र भवनाला जागा मिळाल्यास दोन्ही राज्यांना त्याचा फायदा होईल. श्रीनगरमधील हे महाराष्ट्र भवन केवळ पर्यटकांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देणारे राहणार नाही, तर या ठिकाणी महाराष्ट्राची समृध्द कला, खाद्य आणि संस्कृतीची झलक देखील

Editorial

Editorial

Next Story